17 वर्षांहून लहान मुग्धा गोडसेला डेट करताना राहुल देवला वाटत होता संकोच

17 वर्षांहून लहान मुग्धा गोडसेला डेट करताना राहुल देवला वाटत होता संकोच

बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता राहुल देव याने त्याच्या अभिनय कौशल्येच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. राहुल देवने साकारलेल्या नकारात्मक भूमिकेमुळे तो विशेष ओळखला जातो. राहुलच्या पत्नीचे 2009 मध्ये निधन झाले होते यानंतर राहुलच्या आयुष्यात चार वर्षांनंतर मुग्धा गोडसेची एंट्री झाली. नुकतच राहुल देव याने एका मुलाखती दरम्यान त्याच्या व्यक्तीगत आयुष्यातील घडामोडींचा उलगडा केला आहे. यादरम्यान त्याने मुग्धा सोबत रिलेशनशिपमध्ये असतांना त्याच्या मनात वारंवार संकोच निर्माण होत असे असं वक्तव्य केलं होतं. कारण राहुलला त्याच्या पुर्व पत्नीपासून एक मुलगा होता पत्नीच्या निधनानंतर मुलाल मुग्धा सोबत डेट करण्याची बातमी समजली तर तो काय विचार करेल यामुळे त्याच्या मनात काहीसा संकोच निर्माण झाला होता. पण नंतर माझ्या मुलाला सर्व घटना समजली तेव्हा राहुल म्हणाला आता मला जगापासून काहीच लपवायची गरज नाहीये.

आर जे सिद्धार्थ कन्नन याला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान राहुलने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. राहुल म्हणाला,आपल्या जीवनात काही गोष्टी अश्या असतात की ज्या खऱ्या होतात. जर माझ्या आयुष्यात एक महत्वपुर्ण व्यक्ती आहे तर मला समजत नाही की मी गोष्ट का लपवून ठेऊ. पण फक्त माझ्या मुलामुळे माझ्या मनात काहीसा संकोच होता. तो माझ्या रिलेशनशिपबद्दल काय विचार करेल तसेच मुग्धा आणि माझ्या वयात फार अंतर आहे. पण नंतर त्याने मला काहीच हरकत नाहीये असे सांगितले यानंतर माझ्या आनंदाला पारावर उरला नाही.


हे हि वाचा – Bellbottom सिनेमातील लारा दत्तचा नवा लुक पाहून चाहते हैराण, लाराच्या मेकअप आर्टिस्टच सर्वत्र कौतुक

First Published on: August 5, 2021 9:36 AM
Exit mobile version