Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Bellbottom सिनेमातील लारा दत्तचा नवा लुक पाहून चाहते हैराण, लाराच्या मेकअप आर्टिस्टच...

Bellbottom सिनेमातील लारा दत्तचा नवा लुक पाहून चाहते हैराण, लाराच्या मेकअप आर्टिस्टच सर्वत्र कौतुक

लाराच्या मेकअप आर्टिस्टला नॅशनल अवॉर्ड द्या अशी मागणी केली जात आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) लवकरच बेल बॉटम (Bellbottom) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बेल बॉटम सिनेमातून अक्षय सोबतच बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चेहरे प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. नुकताच सिनेमाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला असून ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. ट्रेलरमधून अभिनेत्री लारा दत्त (lara datta) हिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. लाराच्या बदलेल्या लुकची चांगलीच चर्चा सुरु आहे. या सिनेमात लारा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार असून लाराचा लुक पाहून सिनेमा पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. बेल बॉटमचा ट्रेलरची लाराच्या लुकमुळे सध्या जोरदार चर्चा आणि लारावर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव होत आहे.

- Advertisement -

सिनेमात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारण्यासाठी स्वत:चे पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. ट्रेलरमध्ये लाराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. लाराचा लुक इतका सुंदर जमून आला आहे की इंदिरा गांधींच्या भूमिकेत लाराला ओळखणे देखील कठीण झाले आहे. लाराच्या मेकअप आर्टिस्टचे देखील कौतुक होत आहे. (Lara’s makeup artist is appreciated everywhere) लाराचा लुक बदलण्यासाठी तिच्या मेकअप आर्टिस्टने घेतलेली मेहनत सिनेमाच्या ट्रेलरमधून दिसून आली आहे. लाराच्या मेकअप आर्टिस्टला नॅशनल अवॉर्ड द्या अशी मागणी केली जात आहे. कारण लाराच्या मेकअप आर्टिस्टने हुबेहूब इंदिरा गांधींचा लुक लारा दिला आहे. त्यांच्या सफेद केसांची पट्टी,त्यांचे कपडे, त्याचा ठहेराव हे सगळ इतक्या सुंदर पद्धतीने जमवून आणले आहे की हुबेहूब इंदिरा गांधी डोळ्यासमोर उभ्या राहतात.

- Advertisement -

बेल बॉटम या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. हा सिनेमा १९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ३डी थिएटटरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. अक्षय कुमार,लारा दत्त, हुमा कुरेशी,वाणी कपूर आणि जैकी भगनानी यासारखी तगडी स्टॉरकास्ट सिनेमात पाहता येणार आहे.


हेही वाचा – ‘रंग दे बसंती’ सिनेमात काम करण्यासाठी आमिरने हृतिकला केली होती विनंती म्हणाला…

- Advertisement -