Deep Sidhu Girlfriend : कोण आहे दीप सिध्दूची गर्लफ्रेंड रीना राय ? सेलिब्रेट केला होता व्हॅलेंटाईन डे

Deep Sidhu Girlfriend : कोण आहे दीप सिध्दूची गर्लफ्रेंड रीना राय ? सेलिब्रेट केला होता व्हॅलेंटाईन डे

Deep Sidhu Girlfriend : कोण आहे दीप सिध्दूची गर्लफ्रेंड रीना राय ? सेलिब्रेट केला होता व्हॅलेंटाईन डे

Deep Sidhu Girlfriend : प्रसिद्ध पंजाबी गायक दीप सिध्दूचा सिंघू बॉर्डरजवळल कुंडली मानेसर हायवेवर एका रस्ते अपघातात दुदैवी मृत्यू झाला. शेतकरी आंदोलनावेळी लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यात मुख्य आरोपी होता. अपघातावेळी सिध्दू सोबत त्याची गर्लफ्रेंड रीना राय होती. दोघेही व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी बाहेर गेले होते. दोघे गाडीतून दिल्लीच्या दिशेने परत येत असताना अचानक केएमपीजवळ पिपली टोल प्लाझा जवळ त्याच्या कारची आणि ट्रकची जोरात धडक झाली. यात दुर्दैवाने सिद्धूचे निधन झाले असून त्याची गर्लफ्रेंड रीना रायची प्रकृती आता स्थिर आहे.

दीप सिध्दूच्या निधनाआधी काही तास दीप आणि रीना यांनी व्हॅलेंटाईन डे साजरा केला होता. रीनाने काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर टाकले होते.

 

या फोटोंमध्ये दोघेही फार खुश दिसत होते. एका फोटोमध्ये रीना मिमर सेल्फी काढताना दिसत आहे. तर दुसऱ्या मिरर सेल्फीमध्ये दीप आणि रीना एकत्र असून व्हॅलेंटाईन विश करताना दिसत आहेत. दीप सिध्दूच्या निधनानंतर दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कोण आहे रीना राय ?

दीप सिध्दूची गर्लफ्रेंड आणि त्याची होणारी पत्नी रीना राय ही एक पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. रीना पंजाबी सिनेमातील एक प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखली जाते. पंजाबमध्ये दीप आणि रीना एकाच प्रोजेक्टवर काम करत होते. रीना ही २०१४ची मिस साउथ एशिया देखील आहे.


हेही वाचा –  Deep Sidhu Profile: पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू: लाल किला…

First Published on: February 16, 2022 1:58 PM
Exit mobile version