घरताज्या घडामोडीDeep Sidhu Profile: पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू: लाल किला...

Deep Sidhu Profile: पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू: लाल किला हिंसा प्रकरणातील होता आरोपी

Subscribe

पंजाबचा अभिनेता संदीप सिंग ऊर्फ दीप सिद्धूचा काल, मंगळवारी रात्री रस्ते अपघातात मृत्यू झाला. हा तोच दीप सिद्धू आहे, जो शेतकरी आंदोलनापासून चर्चेत आला होता. दीप सिद्धू एनआयआर मैत्रीण रीना रायसोबत दिल्लीहून पंजाबकडे परतत असताना हा अपघात झाला. हा अपघात केएमपीवरील पिपली टोल प्लाझा येथे झाला आहे. या अपघातात दीप सिद्धूचा मृत्यू झाला असून त्याची मैत्रीण रीना रायची प्रकृती स्थिर आहे. दीप सिद्धूच्या मृत्यूमुळे पंजाबी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.

दीप सिद्धू पंजाबी चित्रपटांतील कामासोबत सामजिक कार्यकर्ताही होता. दीप सिद्धू मूळचा श्री मुक्तसर साहिबमधील उदयकरण गावाचा राहणारा होता. १९८४ साली जन्मलेला दीपचे कुटुंबिय काही वेळानंतर गाव सोडून गेले. दीपने कायद्याचा अभ्यास केला होता. पंजाबी चित्रपटसृष्टीत ‘दीप जोरा १० नंबरिया’नंतर चर्चेत आला होता. ‘जोरा १० नंबरिया’ चित्रपटाचे दोन भाग बनवले होते. या चित्रपटाचा दुसरा भाग लोकांना खूप पसंतीस आला होता. आता ‘जोरा १० नंबरिया’च्या तिसऱ्या भागाची तयार केली जाणार होती.

- Advertisement -

दीपच्या करिअरची सुरुवात

दीपने करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली होती. दीपने लॉचे शिक्षण घेतले होते. तो किंगफिशर मॉडेल हंटचा विजेता होता. मिस्टर इंडिया काँटेस्टमध्ये मिस्टर पर्सनेलिटी किताब त्याने जिंकला होता. २०१५मध्ये दीपचा पहिला पंजाबी चित्रपट ‘रमता जोगी’ प्रदर्शित झाला होता. पण त्याला २०१८मध्ये आलेला ‘जोरा १० नंबरिया’मुळे लोकप्रियता मिळाली, ज्यामध्ये त्यांनी भूमिका गँगस्टरची होती.

इंग्रजीत बोलल्याने दीप सिद्धू आला होता चर्चेत

दीप सिद्धूला शेतकरी संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी दिल्ली बॉर्डरवर बोलण्याची संधी दिली नाही. त्यामुळे दीप सिद्धू सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी नेत्यांच्या या निर्णयावर प्रश्न करत राहिला. शेतकरी आंदोलन दरम्यान तो चर्चेत तेव्हा आला, जेव्हा एका पोलीस अधिकाऱ्यासोबत इंग्रजीमध्ये भांडत होता. यानंतर चित्रपट दिग्दर्शन विवेक अग्निहोत्रीने सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, ‘गरीब भूमिहीन शेतकरी, ज्यांच्यासाठी लोक रडत आहेत.’ त्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला.

- Advertisement -

दिल्ली हिंसा प्रकरणात दीपला केली होती अटक

२६ जानेवारीला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसा प्रकरणात आरोपी ठरवत दीप सिद्धूला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने चंडीगढ जवळील जीरकपूर येथे अटक केली होती. असे म्हटले जाते की, चौकशीमध्ये दीप सिद्धूकडून लाल किल्ला हिंसा प्रकरणातील काही महत्त्वाचे खुलासे होण्याची आशा होती. त्याने एक व्हिडिओ शेअर करून दावा केला होता की, जर त्याने तोंड उघडले तर अनेक चेहरे समोर येतील. दरम्यान दीप सिद्धूच्या अटकेनंतर दिल्ली पोलीसचे पीआरओ चिन्मय विस्वाल म्हणाले होते की, दीप सिद्धूचा फोटो सार्वजनिक होता आणि त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस लावले होते. तसेच दीपबाबत खुलासा झाला होता की, तो पंजाबमध्ये बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याची पत्नी आणि कुटुंबिय बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात राहतात.


हेही वाचा – Sandhya Mukherjee: प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी यांचे निधन, ‘या’ कारणामुळे होत्या चर्चेत


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -