Lata Mangeshkar: …म्हणून लतादीदींनी लग्न नाही केले

Lata Mangeshkar: …म्हणून लतादीदींनी लग्न नाही केले

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वासात शोककळा पसरली आहे. अनेक दशके मंत्रमुग्ध करणारा आवाज आज हरपला आहे. ज्यांच्या प्रेमगीतांनी प्रत्येकांच्या चेहऱ्यावर हसू यायचे, तिच गाणी आज डोळे ओलावत आहेत. गेल्या २८ दिवसांपासून लतादीदींवर उपाचर सुरू होते. तेव्हापासून लतादीदींचे चाहते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत होते. मात्र आज त्यांच्या जाण्यामुळे संगीत क्षेत्रातील एका पर्वाचा अंत झाला आहे.

किशोर कुमार होते लतादीदींच्या प्रेमात

लता मंगेशकर यांनी आपल्या जादुई आवाजाने कोट्यवधी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. अनेक प्रेमगीते लतादीदींनी गायली आहेत. लतादीदींची प्रेम कहाणी सुरू झाली होती, पण काही कारणांमुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. बीबीसीसोबत बातचित करताना लता मंगेशकर म्हणाल्या की, किशोर कुमारांना त्या आवडत असे. अनेक वेळा किशोर कुमार लतादीदींच्या मागे-मागे स्टुडिओपर्यंत जायचे. पण ही गोष्टी लतादीदींना आवडत नव्हती आणि त्यांनी याबाबत तक्रार केली होती. मात्र यादरम्यान लतादीदींना माहिती नव्हते की, ते किशोर कुमार होते.

लतादीदी राज सिंह यांच्या पडल्या होत्या प्रेमात

दरम्यान लता मंगेशकर यांना दिवंगत क्रिकेटर आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राज सिंह यांच्यावर प्रेम झाले होते, ते डूंगरपूरचे महाराज होते. जेव्हा एकेदिवशी लतादीदी क्रिकेट पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेल्या होत्या, तेव्हा त्यांना राज सिंह खूप आवडले होते आणि राज यांना देखील लतादीदींचा आवाज खूप आवडत होता. पण काही कौटुंबिक कारणांमुळे राज सिंह डूंगरपूर आणि लतादीदींचे लग्न होऊ शकले नाही.

छोट्या वयात वडिलांना गमावणे आणि मोठी बहिण असल्यामुळे लता मंगेशकर यांच्यावर जबाबदारी आली होती. जेव्हा लतादीदी १३ वर्षांच्या होत्या तेव्हा १९४२ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे लतादीदींनी लग्नाचा गांभीर्याने विचार केला नाही.


हेही वाचा – Lata Mangeshkar: लतादीदींवर झाला होता विषप्रयोग, घरातच रचण्यात आले होते षडयंत्र


First Published on: February 6, 2022 1:21 PM
Exit mobile version