घरताज्या घडामोडीLata Mangeshkar: लतादीदींवर झाला होता विषप्रयोग, घरातच रचण्यात आले होते षडयंत्र

Lata Mangeshkar: लतादीदींवर झाला होता विषप्रयोग, घरातच रचण्यात आले होते षडयंत्र

Subscribe

गानकोकीळा लता मंगेशकर यांचे निधन झाले असून त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्राला जबर धक्का बसला आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, आज सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी मल्टी ऑर्गन फेलियरमुळे लता मंगेशकर यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्या कोरोनामुक्त झाल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती आणखीन खालावली आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या सुमधूर आवाजाने देशातच नाही तर जगभरात भारतीय संगीत अजरामर करणाऱ्या लतादीदींच्या जाण्याने भारतीय संगीतक्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

लतादीदी यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली मध्य प्रदेशमधील इंदौर येथे झाला. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर प्रतिभाशाली शास्त्रीय गायक आणि नाट्यअभिनेते होते. तर त्यांच्या आई शुद्धमती यांना सगळे माई नावाने ओळखतं. १९६२ साली बीस साल बाद नावाच्या एका हिंदी चित्रपटातील गाण्याच्या रेकॉर्डींगवेळी लतादीदी अचानक आजारी पडल्या.

- Advertisement -

संगीतकार हेमंत कुमार हे गाणे रेकॉर्ड करण्यासाठी तयार होऊन बसले होते. पण लतादीदी रेकॉर्डींगसाठी येवू शकल्या नाहीत. खरं तर लतादीदींनी याआधी असे कधीही केले नव्हते. ऊन असो की पाऊस लतादीदी कशाचीही तमा न बाळगता आपल्या कामाला प्राधान्य देत. पण बीस साल बाद मधील गाण्याच्या रेकॉर्डींगसाठी त्या येऊ शकल्या नाहीत यामुळे सगळीकडे याबदद्ल चर्चा होऊ लागली.

- Advertisement -

पण लतादीदींच्या अशा अचानक आजारी पडण्यामागे मोठे षडयंत्र होते. लतादींदीवर विषप्रयोग करण्यात आला होता. रेकॉर्डींगच्या दोन दिवसाआधी लतादीदी सकाळी नेहमीप्रमाणे उठल्या खऱ्या पण त्यांना अचानक उलट्या होऊ लागल्या. पोटात दुखू लागले. सुरुवातीला अपचन झाले असावे असे त्यांना वाटले पण नंतर मात्र त्यांची तब्येत अधिकच खालावली. यामुळे डॉक्टरांना घरी बोलावण्यात आले. डॉक्टरांनी लतादीदींना तपासले काही चाचण्या केल्यावर त्यांना अन्नातून विष देण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि सगळ्यांना धक्काच बसला. विशेष म्हणजे लतादीदी घरचेच जेवण घ्यायच्या. मग अशावेळी घरातील कोणती व्यक्ती त्यांच्या जीवावर उठली होती हे शोधणे कठीण नव्हतं.लतादीदींच्या घरी स्वयंपाकी होते. ते जे बनवत तेच लतादीदी खातं. यामुळे संशय स्वयंपाक्यांवरच होता. याघटनेने संपूर्ण मंगेशकर कुटुंब हादरलं होतं. त्यानंतर लतादीदींच्या किचनची जबाबदारी त्यांची बहीण उषा यांनी स्वत:कडे घेतली. लतादीदींवर विषाचा गंभीर परिणाम झाला होता. त्यातून बरे होण्यासाठी त्यांना तीन महिन्याचा कालावधी लागला. या तीन महिन्यात त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.

यादरम्यान संगीतक्षेत्रातील अनेकजणांनी लतादीदींची काळजी घेतली. पण या सगळ्यांमध्ये गीतकार आणि संगीतकार मजरुह सुल्तानपुरी हे लतादीदींच्या सर्वाधिक जवळचे होते. लतादीदी आजारी पडल्यापासून मजरुह साहेब रोज सकाळी ६ वाजता त्यांच्या घरी जात. तासन् तास ते लतादीदींच्या उशाशी बसत. त्यांना गाणी, कविता ऐकवित , गप्पा मारत. त्यामुळे लतादीदींनाही बरे वाटे. लतादीदी बऱ्या होईपर्यंत सलग तीन महिने मजरुह साहेब त्यांच्याकडे येत होते. पूर्ण बऱ्या झाल्यानंतर लतादीदींनी सर्वात आधी हेमंत कुमार यांच्या बीस साल बाद चित्रपटातील गाण्याचे राहीलेले रेकॉर्डींग पूर्ण केले. गाणे होते कही दीप जले कही दिल….हे गाणेही सुपरहीट झाले.

लतादीदी -नूरजहाँ यांची सीमापार मैत्री

संगीतकार गीतकार रामचंद्र यांनी त्यांच्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे. कारण या घटनेचे ते साक्षीदार होते. एकदा तर रामचंद्र यांच्या झांझर या चित्रपटातील गाण्याच्या लॉंचिंगवेळी लतादीदींना गायिका नूरजहाँ यांची आठवण आली. त्यावेळी नूरजहाँ पाकिस्तानमध्ये आपल्या पतीसोबत राहत होत्या. रामचंद्र यांनी लगेचच फोनवरून लतादीदी आणि नूरजहा यांचे फोनवर बोलणे करून दिले. दोघेजणी १ तास गप्पा मारत होत्या. यादरम्यान दोघींनी एकमेकांच्या आवडीची गाणी देखील गायिली. त्यानंतर लतादीदींनी नूरजहा यांना पाकिस्तानमध्ये जाऊन भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांच्याकडे पासपोर्ट नव्हता. यामुळे रामचंद्र यांनी बाघा बोर्डरवर या दोघींची भेट घडवून आणली होती. त्यावेळी हा किस्सा खूप गाजला होता.


हेही वाचा – Lata Mangeshkar Passes Away: ज्येष्ठ गायिका लतादीदी काळाच्या पडद्याआड; ९२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -