Rajesh Khanna : …..म्हणूनच राजेश खन्ना यांचे नाव बदलले

Rajesh Khanna : …..म्हणूनच राजेश खन्ना यांचे नाव बदलले

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत राजेश खन्ना यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमध्ये राजेश खन्ना यांना काका म्हणून देखील ओळखलं जातं. त्यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 रोजी पंजाबी हिंदू खत्री या कुटुंबात झाला होता. त्यांच्या आई-वडीलांनी त्यांचे नाव जतिन खन्ना ठेवलं होतं. घरची परिस्थिती खराब असल्याने त्यांच्याच एका जवळच्या नातेवाईकांनी राजेश खन्ना यांना दत्तक घेतलं आणि त्यांचं पालन-पोषण केलं.

राजेश खन्ना यांचे शिक्षण गोव्यातील सेंट सेबेस्टियन हायस्कूलमध्ये झालं.त्यानंतर हळूहळू त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. शाळेत आणि कॉलेजमध्ये त्यांनी अनेक नाटकांमध्ये भाग घेतला होता. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वा राजेश खन्ना यांना आपलं नाव बदलाव लागलं. जतिन खन्ना हे नाव काढून त्यांनी त्यांचं नाव राजेश खन्ना ठेवलं. 1966 मध्ये ‘आखरी खत’या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक वर्ष आधी शशी कपूरचा ‘जब जब फूल खिले’हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. याचं चित्रपटातील एका अभिनेत्याचे नाव देखील जतिन खन्ना होतं. त्यामुळे दोन दोन नावांचा गोंधळ होऊ नये म्हणून राजेश खन्ना यांनी आपलं नाव राजेश खन्ना केलं. मात्र, हे नाव त्यांच्यासाठी लकी ठरलं आणि हळूहळू ते बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार झाले.

 

1970 च्या सुरुवातीला राजेश खन्ना फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री अंजू महेंद्रूच्या प्रेमात पडले. ते दोघेही सात वर्ष एकमेकांसोबत होते. राजेश खन्नांच्या आग्रहाखातर अंजू महेंद्रूंना आपलं अभिनय क्षेत्र सोडावं लागलं. त्यानंतर काही दिवसांनी ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. 1973 मध्ये राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडियासोबत लग्न केलं. त्यानंतर त्यांना ट्वींकल आणि रिंकी या दोन मुली झाल्या. 1982 राजेश आणि डिंपल हे एकमेकांपासून वेगळे झाले.

राजेश खन्ना यांना अनेक पुरस्कार मोठमोठे मिळाले होते. 18 जुलै 2012 मध्ये त्यांचे निधन झाले.


हेही वाचा :

बॉलिवूडच्या फ्लॉप चित्रपटांत ‘सर्कस’चा समावेश; आठवड्यात कमावले केवळ इतके कोटी

First Published on: December 29, 2022 11:42 AM
Exit mobile version