घरमनोरंजनबॉलिवूडच्या फ्लॉप चित्रपटांत ‘सर्कस’चा समावेश; आठवड्यात कमावले केवळ इतके कोटी

बॉलिवूडच्या फ्लॉप चित्रपटांत ‘सर्कस’चा समावेश; आठवड्यात कमावले केवळ इतके कोटी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह, जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडे यांचा ‘सर्कस’ चित्रपट 23 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन होणार असल्याचं म्हटलं जात असलं तरी पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने फारशी कमाई केलेली नाही. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी केवळ 6 कोटींची कमाई केली होती. यामागचं कारण म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेले ‘दृश्यम 2’ आणि ‘अवतार 2’ हे चित्रपट आहेत. या चित्रपटांकडे प्रेक्षकांचा कल अधिक पाहायला मिळत आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहेत. त्यामुळे ‘सर्कस’ चित्रपटाच्या कमाईत वाढ दिसून येत नाही.

‘सर्कस’ची बॉक्स ऑफिसवरील एकूण कमाई

- Advertisement -

सर्कसरणवीर सिंहच्या ‘सर्कस’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली असून दुसऱ्या दिवशी 6.50 कोटींची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी 8.2 कोटी आणि चौथ्या दिवशी 2.25 कोटी कमावले . पाचव्या दिवशी चित्रपटाने 2.18 कोटी कमावले शिवाय आत्तापर्यंत एकूण या चित्रपटाने 25.44 कोटींचा आकडा पार केला आहे. तसेच जगभरातून या चित्रपटाने 28.6 कोटींची कमाई केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी हा चित्रपट तयार करण्यासाठी एकूण 150 कोटींचा खर्च केला आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत कमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

‘दृश्यम 2’ आणि ‘अवतार 2’कमावले इतके कोटी
41 व्या दिवशी ‘दृश्यम 2’ने आत्तापर्यंत 230.15 कोटी कमावले आहेत. तर ‘अवतार 2’ने 13 दिवसात आत्तापर्यंत 284.60 कोटी कमावले आहेत.

- Advertisement -

‘सर्कस’मध्ये दिसणार जुळ्या भावांची गोष्ट
रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस चित्रपट विल्यम शेक्सपिअरचे नाटक द कॉमेडी ऑफ एरर्स वर आधारित आहे. यामध्ये रणवीर सिंह डबल रोलमध्ये दिसणार आहे. रणवीर व्यतिरिक्त वरुण शर्मा देखील या चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहे. ‘सर्कस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती रोहित शेट्टीने केली असून यामध्ये रणवीर सिंह, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, वरुण शर्मा, जॉनी लीवर हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसतील.23 डिसेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

 


हेही वाचा :

“धर्मवीर एका भागात संपणारा विषय नसून, तो एक खंड आहे,”- मंगेश देसाई

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -