विल स्मिथने दिल्या रणवीरला शुभेच्छा

विल स्मिथने दिल्या रणवीरला शुभेच्छा

विल स्मिथ सोबत रणवीर सिं

बॉलिवूड कलाकारांच्या कामाची स्तुती आंतरराष्ट्रीय स्तरावर फार कमी प्रमाणात होते. अशातच हॉलिवूडचा प्रसिद्ध कलाकार विल स्मिथयाचे बॉलिवूड प्रेम समोर आले आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘गली बॉय’ चित्रपटाचे विल स्मिथने कौतुक केलं आहे. हा कौतुकाचा व्हिडिओ विल स्मिथने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर टाकला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ३२.५० कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटात रणवीर याने केलेल्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. विल स्मिथ एक अभिनेत्याबरोबरच रॅप गायक देखील आहेत. स्मिथची रॅप गाणी अनेकदा त्याच्या चित्रपटावर आधारित असतात. ‘गली बॉल’ चित्रपटात रणवीरचे अपना टाइम आऐगा’ हे गाणे प्रसिद्ध झाले आहे.

काय म्हणाला विल स्मिथ

“हे… रणवीर तुला खूप शुभेच्छा, “गली बॉय”च्या माध्यामातून तु जे काम केले ते मला आवडले. मी संपूर्ण देशाच्या हिप-हॉपवर माझे लक्ष आहे. अशाच प्रकारे काम करत रहा” – विल स्मिथ

First Published on: February 17, 2019 12:32 PM
Exit mobile version