घरमनोरंजनरणवीरची मस्ती सेल्फीत कैद

रणवीरची मस्ती सेल्फीत कैद

Subscribe

सध्यातरी उत्साही स्टार, अभिनेता म्हणून रणवीर सिंगचे नाव घेतले जाते. तो जिथे जातो, तिथे तो स्वत: आनंदी आणि उत्साही असतोच परंतु त्याच्या या मस्तीपूर्ण आणि हजरजबाबी संवादांमुळे तो आपल्या सान्निध्यात येणार्‍यालाही तेवढेच उत्साही बनवतो. पण खर्‍या अर्थाने दोन उत्साही माणसे एकत्र येतात, तेव्हा तिथले वातावरण आणखीनच गमतीशीर होते. ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या निमित्ताने रणवीर सिंगने रेड एफएम रेडिओ स्टेशनच्या स्टुडिओ भेट दिली. आर जे मलिष्का हिच्या प्रत्यक्ष भेटीने जे काही वातावरण तिथे तयार झाले ते पाहून या चित्रपटाची नायिका आलिया भट थक्क झाली आणि तीही तेवढ्याच तत्परतेने या आनंदात सहभागी झाली. सेल्फीचा मोह तिला काही आवरता आला नाही. रणवीरची मस्ती त्याने स्वत:हूनच सेल्फीत कैद केली.

रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि झोया अख्तर यांनी एकत्र येऊन ‘गली बॉय’ या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी झोयाने स्वीकारलेली आहे. याच महिन्यात प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाचे प्रमोशन सध्या चालू आहे. रणवीर आलिया भट यांच्याबरोबर कल्की, अमृता सुभाष, विजय राज यांचासुद्धा कलाकार म्हणून या चित्रपटात सहभाग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -