लवकरच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस

लवकरच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस

लवकरच 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस

लग्न हे केवळ दोन जिवांचे मिलन नसून त्या एका क्षणात अनेक नवी नाती जन्माला येत असतात. आपलं सुखाचं-हक्काचं माहेर सोडून मुलगी एका वेगळ्याच कुटुंबात प्रवेश करते. असं घर जे इथून पुढे तिचं होणार असतं. या प्रवासात तिला पतीची साथ असली तरी एका जिवाभावाच्या मैत्रिणीची तिला कायमच उणीव भासत असते. अशावेळी सासूच जर तिची सखी झाली तर नात्यांचा गोडवा अधिकच वाढतो. आणि घराचं गोकुळ होतं. अशाच एका गोड नात्याची कथा सांगणारी मालिका झी मराठीच्या प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही गोष्ट आहे शकु आणि स्वीटूच्या नात्याची. नात्यानं या दोघी सासू सून आहेत पण मनानं मैत्रीच्या धाग्यानं घट्ट बांधल्या गेल्या आहेत. मिश्किल सासू आणि खट्याळ सून मिळून घरात वेगळीच गंमत आणतात आणि या गंमतीचच नाव आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’.

या मालिकेची पटकथा सुखदा आयरे, कथा विस्तार समीर काळभोर आणि संवाद किरण कुलकर्णी, पल्लवी करकेरा यांचे आहेत. मालिकेचे दिगदर्शक अजय मयेकर आहेत. शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, दीप्ती केतकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. शाल्व किंजवडेकर नायकाच्या भूमिकेत आणि अन्विता फलटणकर नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका ४ जानेवारी पासून झी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे.


हेही वाचा – आगामी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेच्या सेटची सोशल मीडियावर चर्चा


 

First Published on: December 30, 2020 6:04 PM
Exit mobile version