घरमनोरंजनआगामी 'पुण्यश्लोक अहिल्याबाई' मालिकेच्या सेटची सोशल मीडियावर चर्चा

आगामी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेच्या सेटची सोशल मीडियावर चर्चा

Subscribe

पुण्यश्लोक अहिल्याबाई ४ जानेवारीपासून छोट्या पडद्यावर येण्यास सज्ज

भव्य ऐतिहासिक मालिका पुण्यश्लोक अहिल्याबाई नववर्षाची प्रेरणादायक सुरुवात करत ४ जानेवारीपासून छोट्या पडद्यावर येण्यास सज्ज आहे. या मालिकेत इतिहासातील एक महत्त्वाचे प्रकरण जिवंत करण्यात आले आहे, ज्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांची जीवनगाथा मांडली आहे. छोट्या पडद्यावरच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या आगामी मालिकेच्या सेटची चांगलीच चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

या मालिकेसाठी तब्बल सहा महिन्यांपासून संशोधन सुरू होतं तर सहा महिने सेटच्या निर्मितीसाठी लागले आहेत. या सेटचं डिझाइन तयार करताना, कला दिग्दर्शकांनी सेट डिझाइन करतानाच इतर घटकांची, जसं की, पोशाख, प्रकाश आणि अगदी प्रॉपचा देखील कसून विचार केला आहे, जेणे करून १८व्या शतकाचा काळ हुबेहूब प्रेक्षकांना पाहाता येईल.

- Advertisement -

सेट उभारण्याच्या प्रेक्रियेबद्दल बोलताना कला दिग्दर्शक नरेंद्र राहुरीकर म्हणाले, ‘हा सेट तयार करताना आमची प्रेरणा होती, १५ व्या ते १८ व्या शतकातील मराठी-माळवा संस्कृती. मी यापूर्वी काही पौराणिक मालिकांसाठी काम केलेलं आहे पण ही माझी पहिलीच ऐतिहासिक मालिका आहे, आणि मी म्हणेन की, हा अगदीच वेगळा अनुभव आहे. पौराणिक मालिकांमध्ये कलात्मक स्वातंत्र्य घेता येते, पण इथं मात्र जास्तत जास्त अचूक आणि नेमके असण्यावर आमचा भर असतो कारण त्याची सहज तुलना केली जाते. सेट डिझाइन अस्सल दिसण्यासाठी आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पार्श्वभूमीसाठी पडदे आणि महालतील इतर फर्निचरसाठी अस्सल आणि उच्च दर्जाचे महेश्वरी वस्त्र वापरले आहे.

“पुण्यश्लोक अहिल्याबाई” ही आगामी मालिका आणि या भव्य ऐतिहासिक मालिकेचा शुभारंभ ४ जानेवारी रोजी होणार आहे. या मालिकेतील घटनांचे साक्षीदार होण्यासाठी सोम-शुक्र रात्री साडेसात वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर ही मालिका बघता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -