Yeu KashiTashi Me Nandayla: स्वीटू आणि ओमची लग्नघटिका समीप

Yeu KashiTashi Me Nandayla: स्वीटू आणि ओमची लग्नघटिका समीप

Yeu KashiTashi Me Nandayla: स्वीटू आणि ओमची लग्नघटिका समीप

झी मराठीवरील  ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu KashiTashi Me Nandayla) ही लोकप्रिय मालिका दिवसेंदिवस रंजक वळण घेत असून आता मालिकेत स्वीटूच्या आईने म्हणजेच नलूने देखील ओम आणि स्वीटूच्या लग्नाला परवानगी दिली आहे. मालिकेत सध्या आनंदी आनंद दिसतोय आणि त्याचसोबत ओम व स्वीटूच्या लग्नाची लगबग देखील चालू आहे. ओम आणि स्वीटू खूप खुश आहेत कारण इतक्या कठीण प्रसंगांना तोंड देऊन शेवटी ते दोघे एकत्र येणार आहेत. नुकताच ओम आणि स्वीटूचा साखरपुडा झालेला प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं. आता त्यांच्या लग्न सोहळा प्रेक्षक रविवार २२ ऑगस्ट रोजी २ तासांच्या विशेष भागात पाहू शकतील. या विशेष भागात स्वीटू आणि ओम यांचा लग्न सोहळा निर्विघ्न पार पडेल का? मालविका जी स्वीटू आणि ओम यांच्या नात्याने कधीच खुश नव्हती. स्वीटू खानविलकरांची सून होऊ नये यासाठी मालविकाने आजवर खूप प्रयत्न केले. त्यांच्या प्रेमाच्या वाटेत अनेक अडथळे निर्माण केले.

पण आता मालविका ओम आणि स्वीटूचं नातं मान्य करेल कि या लग्न सोहळ्यात देखील मोहित सोबत मिळून हे लग्न थांबवण्यासाठी काही वेगळा प्लॅन करेल? ओम मालविकाचा डाव उधळून लावेल? मालविकाचा खरा चेहरा ओम समोर येईल का? ओम आणि स्वीटूच लग्न सुरळीत संपन्न होऊन मालविकाच्या मनाविरुद्ध स्वीटू खानविलकरांच्या घरात सून म्हणून प्रवेश करेल का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.


हे हि वाचा – Indian Idol : अरुणिताने पवनदीप राजनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा केला खुलासा

First Published on: August 19, 2021 5:31 PM
Exit mobile version