घरमनोरंजनIndian Idol : अरुणिताने पवनदीप राजनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा केला खुलासा

Indian Idol : अरुणिताने पवनदीप राजनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा केला खुलासा

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय संगीत रिऑलिटी शो इंडियन आयडल १२ (Indian Idol) चा ग्रँन्ड फिनाले सोहळा नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये पवनदीप राजनने (pawandeep rajan) विजेते पद पटकावत ‘इंडियन आयडल १२’ च्या ट्रॉफीवर नाव कोरले. तर अरुणिता कांजीलाल उपविजेती ठरली. पण स्पर्धे व्यतिरिक्त दोघांमध्ये काहीतरी शिजत आहे अशी चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून रंगत होती. चाहत्यांनी तर अरुणिता आणि पनवदीप यांचे नाव एकत्र करुन ‘अरुदीप’ असं नवीन हॅशटॅग देखील तयार केलं होतं. पवनदीपने अनेकदा माध्यमांशी बोलतांना अरुणिता सोबत अफेयर तसेच लिंक अपच्या बातम्या बद्दल स्वत:चं मत व्यक्त केलं होतं. आता अरुणिताने त्यांच्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला आहे. अरुणिताने पवनदीप सोबत तिचं काय नातं आहे याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. (arunita kanjilal speaks up about relationship rumours with pawandeep rajan)

एका मुलाखती दरम्यान अरुणिताने सांगितले आहे की,” पवनदीप आणि मी एक चांगले मित्र आहोत आणि नेहमी राहू. मी तुम्हां सर्वाचे आभार मानते. तुम्ही सर्वांनी दोघांना इतकं प्रेम दिलं तसेच आमची प्रशंसा केली. आम्ही खूप लांबचा प्रवास केला आहे. तसेच यापुढे देखील एकमेकांसोबत राहू”

 

View this post on Instagram

 

A post shared by Arunita Kanjilal (@arunitakanjilal)

- Advertisement -

इंडियन आयडचे पर्व सुरू झाल्यापासून सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. याचदरम्यान नेटकऱ्यांनी पवनदीप आणि अरुणिता यांच्या जोडीला चांगलीच पसंती दर्शवली होती. पण आमच्यात फक्त मैत्रीपूर्ण संबध आहेत. याचा अनेकदा पवनदीप आणि अरुणिताने खुलासा केला होता. पवनदीप राजनला ‘इंडियन आयडल १२’ ची चमकती ट्राफी आणि २५ लाखांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले. यावेळी सिने विश्वातील अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात जावेद अली, मनोज मुंतशीर, उदित नारायण, कुमार सानू, मिका सिंग, अल्का याग्निक अशा अनेक दिग्गजांनी धमाकेदार परफॉर्मन्स दिलेत. तसेच यापूर्वीच्या सिजनमधील स्पर्धकांनीही दमदार परफॉर्मन्स दिलेत. प्रत्येकाने अनु मलिकसोबतही परफॉर्मन्स सादर केला.

- Advertisement -

हे हि वाचा- No Entry Sequel: 16 वर्षांनी पुन्हा एकदा सलमान खान दिसणार ‘प्रेम भाई’च्या भूमिकेत

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -