कपडे बदलताना सासरे खोलीत यायचे अन्…; Yo Yo Honey Singh च्या पत्नीचे गंभीर आरोप

कपडे बदलताना सासरे खोलीत यायचे अन्…; Yo Yo Honey Singh च्या पत्नीचे गंभीर आरोप

तब्येत ठिक नसल्याचे कारण देत हनी सिंगने कोर्टात मारली दांडी

बॉलिवूडमधील लोकप्रिय रॅपर हनीसिंग (Yo Yo Honey Singh ) त्याच्या नव्या गाण्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. परंतु सध्या हनीसिंग वेगळ्याच वादात अडकला आहे. हनीसिंगची पत्नी शालिनी तलवार हिने घरगुती हिंसाचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. शालिनीने हनीसिंगवर शारिरीक हिंसा, लैंगिक हिंसा, मानसिक छळ आणि आर्थिक हिंसा केल्याचा आरोप लावला आहे. हनीसिंगबाबत शालिनीने खूप मोठे खुलासे केले आहेत आणि त्याच्या कुटुंबियांवर देखील गंभीर आरोप केला आहे.

हनीसिंगचे कुटुंब सतत तिला शारिरीक त्रास देत होते, असे तिने सांगितले आहे. शालिनीने म्हणाली की, हनीसिंग आणि त्याच्या कुटुंबाने तिला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या इतके तोडले होते की, तिला एखादे जनावर असल्याचे वाटत होते. तिने तिच्या सासरे म्हणजे हनीसिंगच्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहे. शालिनी म्हणाली की, जेव्हा केव्हा ती कपडे बदलायची तेव्हा तिचे सासरे खोलीत घुसायचे आणि तिला अयोग्य स्पर्श करायचे.

एवढेच नव्हेतर हनीसिंगचे इतर महिलांसोबत संबंध होते. तो अल्कोहल आणि ड्रग्ज अॅडिक्ट झाला होता, असा खुलासा शालिनीने केला आहे. तसेच हनीसिंगने लग्नाची अंगठी देखील घातली नव्हती. जेव्हा ती हनीसिंगसोबत लग्नाचे फोटो ऑनलाईन टाकायची तेव्हा तिला मारहाण करायचा, असे अनेक खुलासे शालिनीने केले आहे. माहितीनुसार शालिनीने याप्रकरणी १० कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.


हेही वाचा – अभिनेत्री,यूट्यूबर उर्मिलाच्या घरी नव्या हिरोची एंट्री! दिला गोंडस मुलाला जन्म


First Published on: August 5, 2021 6:22 PM
Exit mobile version