घरताज्या घडामोडीअभिनेत्री,यूट्यूबर उर्मिलाच्या घरी नव्या हिरोची एंट्री! दिला गोंडस मुलाला जन्म

अभिनेत्री,यूट्यूबर उर्मिलाच्या घरी नव्या हिरोची एंट्री! दिला गोंडस मुलाला जन्म

Subscribe

रंगभूमीपेक्षा जास्त नाट्य निर्मिती खऱ्या आयुष्यात होऊन हिरोची एंट्री होते. माझ्या आयुष्यात ३ ऑगस्टला सकाळी हिरोची एंट्री झालीय!', अशी पोस्ट लिहित उर्मिलाने तिच्या चाहत्यांना ती आई झाल्याची बातमी दिलीय.

सर्वांची लाडकी यूट्यूबर आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) आता आई झाली आहे. उर्मिलाने ३ ऑगस्टला एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. (Marathi Actress youtuber urmila nimbalkar blessed baby boy ) ‘३ ऑगस्टला माझ्या आयुष्यात सकाळी हिरोची एंट्री झाली’, असं म्हणत उर्मिलाने तिच्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली. उर्मिलाच्या या गोड बातमीनंतर तिच्या पोस्टवर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षांव होत आहे. खरंतर दोन दिवसांपूर्वी उर्मिलाच्या इंन्टाग्राम अकाउंटवरुन ‘कोणत्याही क्षणी…आनंद,परमानंद,गोविंद अशी पोस्ट केली होती. तेव्हापासून उर्मिलाच्या बाळाच्या बातमीसाठी तिचे चाहते प्रचंड उत्सुक होते. शेवटी आज सकाळी उर्मिला ती आई झाल्याची बातमी तिच्या चाहत्यांना दिली.

- Advertisement -

‘वडिलांवर,भावावर,सासऱ्यांवर आणि सगळ्यात जास्त चुकलं म्हणजे नवऱ्यावर अति प्रेम असलं की,रंगभूमीपेक्षा जास्त नाट्य निर्मिती खऱ्या आयुष्यात होऊन हिरोची एंट्री होते. माझ्या आयुष्यात ३ ऑगस्टला सकाळी हिरोची एंट्री झालीय!’, अशी पोस्ट लिहित उर्मिलाने तिच्या चाहत्यांना ती आई झाल्याची बातमी दिलीय. उर्मिलाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाल्याने उर्मिला तिचा नवरा सुकिर्त तिचे संपूर्ण कुटुंब आणि तिची संपूर्ण यूट्यूब फॅमिली तसेच मित्रपरिवार फार खुश झाल्याचे पहायला मिळत आहे. उर्मिलाच्या पोस्टवर अनेकांनी तिला कमेंट करत तिला व तिच्या बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. मराठी अभिनेत्री जुई गडकरी, हेमांगी कवी, स्वप्निल जोशी,सारंग साठे, केतकी विलास, यासारख्या कलाकारांनी उर्मिलाला शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

उर्मिलाचं पारंपरिक डोहाळे जेवळ

गेल्या काही दिवसांपासून उर्मिलाच्या डोहाळे जेवणाची प्रचंड चर्चा रंगली होती. उर्मिलाच्या डोहाळे जेवणाचा समारंभ खास पारंपरिक पद्धतीने पुण्याच्या ठेपे वाड्यात पार पडला. डोहाळे जेवणाच्या समारंभाला उर्मिला केला गेट अप सोशल मीडियावर आकर्षणाचा विषय ठरला. डोहाळे जेवणाचा व्हिडिओ देखील उर्मिलाने सर्वासोबत शेअर केला होता. उर्मिलाने सोशल मीडियावर तिच्या डोहाळे जेवणाचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

प्रेग्नंसीच्या काळात उर्मिला सोशल मीडियावर फार सक्रीय होती. तिच्या प्रेग्नंसीचे वेळोवेळीचे अपडेट उर्मिला देत होती. उर्मिलाच्या बेबी बंपच्या फोटोंवरुन उर्मिला ट्रोल देखील करण्यात आले होते. मात्र ट्रोलर्सना उर्मिलाने सडेतोड उत्तर दिले होते. उर्मिला एक यूट्यूबर होण्याआधी उत्तम अभिनेत्री आहे. दुहेरी मालिकेतून उर्मिला छोट्या पडद्यावर दिसली होती. त्याचप्रमाणे सनई चौघडे, एक तारा, हायवे यासांरख्या सिनेमात तिने काम केले आहे. उर्मिला सध्या एक यशस्वी यूट्यूबर असून तिच्या उर्मिला निबांळकर या यूट्यूब चॅनेलवरुन ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किनकेअर, मेकअप, DIY आणि फॅशन यांसारख्या विषयावर ती व्हिडिओ घेऊन येत असते.


हेही वाचा – ऋता दुर्गुळे म्हणतेय ‘कमिंग बॅक होम वाली फीलिंग’, ऋताचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -