‘आदिपुरुष’ किस प्रकरण : आमच्यावेळी सीतेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीला किस…

‘आदिपुरुष’ किस प्रकरण : आमच्यावेळी सीतेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीला किस…

मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा ‘आदिपुरुष’सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी तिरुपतीमध्ये या चित्रपटाचा एक प्री-रिलीज इव्हेंट पार पडला. त्यानंतर तिरुपती बालाजी मंदिर परिसरात कृती सेनन आणि ओम राऊत उभे होते. यावेळी ओम राऊतने कृतीला बाय बोलताना किस केलं. ज्यामुळे वित्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या तिरुपती बालाजी परिसरात घडलेल्या या प्रकारावर मंदिरातील पूजाऱ्याने आपत्ती दर्शवली. शिवाय सोशल मीडियावरही अनेकांनी कृती आणि दिग्दर्शकाला ट्रोल केलं. दरम्यान, याच प्रकरणावर अभिनेत्री दीपिका चिखलियाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कृतीने केवळ भूमिका साकारली, मी भूमिका जगले! – दीपिका चिखलिया

 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाकतीत रामायण फेम अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, “मला वाटतं आजच्या कलाकारांची ही एक मोठी समस्या आहे की, ते ना पात्रात शिरतात ना त्यांच्या भावना समजून घेतात. त्यांच्यासाठी रामायण हा फक्त एक चित्रपट असावा. क्वचितच त्यांनी आपला आत्मा त्यात टाकला असेल. कृती देखील आजच्या पिढीतील अभिनेत्री आहे. आज काळात कोणालाही मिठी मारणे किंवा कोणालाही किस करणं हे सामान्य मानले जाते. ती स्वतःला कधीही सीता समजली नसेल, हा भावनांचा विषय आहे. मी सीतेची भूमिका जगले आहे. आजकालच्या अभिनेत्री त्या पात्राकडे केवळ भूमिका म्हणून पाहतात. चित्रपट संपल्यानंतर त्यांना काहीही फरक पडत नाही.”

चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 16 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :

अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शि

First Published on: June 9, 2023 11:51 AM
Exit mobile version