मुलांच्या भवितव्यासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक

मुलांच्या भवितव्यासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक

आज बहुतेक दोघेही पालक नोकरी करणारे असतात, अर्थात असंख्य अपवाद असतीलच. पण प्रापंचिक गरजा आणि खर्च वाढते असतात, त्यात भर पडत असते ती अक्राळविक्राळ महागाईची. एकाच्या नोकरीत संसार चालवणे सोप्पे नसते. कमावणारा एक असो की दोघे परंतु काही खर्चाच्या मुद्यावर ‘तडजोड’ हा शब्दच नसतो. त्यापैकी एक म्हणजे मुलांचे शिक्षण आणि दुसरा म्हणजे घरातील ज्येष्ठांचे आरोग्य. मुलांना वाढवणे आणि शिक्षण देणे हे आता बर्‍यापैकी कॉस्टली अफेअर झालेले आहे. अर्थात कितीही खर्च करावा लागला तरी चालेल, पण आम्ही आमच्या बाबुला किंवा बेबीला इंग्रजी माध्यमाच्या बड्या स्कूलमध्येच घालणार. महत्वाचा मुद्दा हा की, आजकाल मुलांसाठी आपण खर्चाला मागेपुढे पहात नाही.मॉलमध्ये नेऊ,मल्टीप्लेक्सला लावू आणि भरपूर खर्च करू. कारण मुलांना असे वाटता नये की, आपले पालक गरीब आहेत.

मुलांसाठी आर्थिक तरतूद का करायला हवी ?

मुलांसाठी काही पारंपरिक गुंतवणूक साधने – आजवर आपल्या आई-वडिलांच्या काळात काही साधने होती. उदाहरणार्थ – पी.पी.एफ., पोस्टाच्या काही योजना.आजदेखील अशा काही योजना उपलब्ध आहेत. परंतु काळाच्या ओघात अधिक उत्पन्न देणारी योजना आपल्याला सोयीची आणि हवीहवीशी वाटते. म्हणूनच बँकेतील मुदत ठेवी किंवा रिकरिंग डिपोझीट यांच्यापेक्षा नवीन योजना आकर्षक वाटतात. उदा- म्युच्युअल फंड अधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने बाजारात अनेक मार्ग आहेत, पैकी शेअर्समधील गुंतवणूक लाभदायी पण जोखीम सहन करण्याची क्षमता मात्र हवी. म्हणून म्युच्युअल फंड एक नामी साधन समजले जाते.आणि यात आपल्या व मुलांच्या गरजानुसार पैसे गुंतवता येतात. आणि नेमके त्याच हेतूसाठी वापरता येतात.

मुलांसाठी म्युच्युअल फंड योजनांचा विचार का करावा?

थेट शेअरबाजारात पैसे टाकण्याचा धोका नको असेल, तर म्युच्युअल फंड हा सेफ-नफादायी पर्याय मानला जात आहे.कसा आणि का ? ते पाहूया.
एक रकमी तसेच टप्याटप्याने पैसे गुंतवण्याची सुविधा
व्यावसायिक पद्धतीने गुंतवणूक
जोखीम विभागली जाते
अनेक फंडांचे पर्याय उपलब्ध
शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय लागते
वेगवेगळ्या कालावधीचे पर्याय
आपल्या बजेटनुसार, गरजेप्रमाणे ‘निवड’ करण्यास वाव
योग्य मार्गदर्शन

नेमकी निवड कशी करावी ? कोणते निकष असावेत?

कसे आणि कशात गुंतवाल?

अ अल्प -मुदतीसाठी – छान व्याज व रोकड-सुलभता

ब दीर्घकालीन मुदतीसाठी -चांगले व्याज आणि वृद्धी

जोखीम पेलण्याची क्षमता पाहून आपण विविध योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता म्हणजे एकत्रित न ठेवता विविध योजनांचा लाभ मिळू शकतो.

योग्य माहिती- योग्य निवड –

आपण कोणती योजना निवडावी? याचे मार्गदर्शन गुंतवणूक-सल्लागार-तज्ञ यांच्याकडूनच घ्यावे. ऐकीव किंवा काल्पनिक उदाहरणावरून कोणता असा निर्णय घेऊ नये.तुमची आजची कमाई,त्यात प्रतिवर्षी होणारी वाढ यांची अजून दहा-बारा वर्षांनी शिक्षणासाठी नेमकी किती फी होईल? अशी सांगड घातली गेली तर बचत आणि भविष्यकालीन गरज हे जुळतील आणि नेमका लाभ होऊ शकेल. केवळ शिक्षणच नव्हे तर मुलामुलींच्या जीवनातील लग्न -नवीन घर असे महत्वाचे टप्पे पार करण्यासाठी ‘आर्थिक पाठबळ’ देण्याचे काम होऊ शकते.

राजीव जोशी 

(अर्थ आणि बँकिंग अभ्यासक)

First Published on: September 9, 2018 1:10 AM
Exit mobile version