दीपिकाचे बोलके मौन आणि भारताचे नवे शिवाजी!

दीपिका पदुकोण ही भारतीय स्तरावरची अत्यंत आघाडीची अभिनेत्री. ती जेएनयूच्या विद्यार्थ्यांसोबत उभी राहिली. तिच्या या छोट्याशा कृतीने माध्यम विश्व आणि सांस्कृतिक क्षेत्र ढवळून निघाले. खरे तर तिने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तरीही तिचे धीरगंभीर मौन मात्र खूप काही सांगणारे होते. थेट विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्या बाजूने उभे राहणे ही घटना साधी नाही. कारण सेलिब्रेटींनी केलेल्या कोणत्याही कृतीचे अथवा भूमिकेचे बरेवाईट परिणाम होण्याची मोठी शक्यता आपल्या देशात असते. जयभगवान गोयल हे पूर्वाश्रमीचे शिवसेना कार्यकर्ते आणि सध्या भाजपचे वरिष्ठ नेते. मोदींवर त्यांचे प्रेम असण्यात गैर काही नाही. मात्र हे प्रेम व्यक्त करताना त्यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहून मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्याचा त्यांना झालेला मोह मात्र अनाकलनीय म्हणावा लागेल.

सरत्या वर्षाने सरता सरता अनेक कटू आठवणी आपल्याला दिल्या. त्या विसरून नव्या वर्षात आपण प्रवेश केला खरा; पण नव्या वर्षाच्या प्रारंभालाच गालबोट लागले. अगदी पहिल्याच दिवशी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकणार्‍या विद्यार्थ्यांवर बुरखाधारी गुंडांनी सशस्त्र हल्ला केला आणि आपण सारेच एका दुर्दैवी घटनेचे साक्षीदार बनलो. हा हल्ला कुणी केला? का केला? या गोष्टी जरावेळ बाजूला ठेवून या घटनेकडे तटस्थपणे पाहूयात. जेएनयू हे भारतीय तरुणांच्या राजकारणाचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र राहत आले आहे. या विद्यापीठाला एक मोठी राजकीय परंपरा आहे. हे विद्यापीठ कधीकाळी केवळ निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत राहत होते; पण मागच्या काही वर्षांपासून ते सतत केंद्रस्थानी राहिले आहे. कन्हैयाकुमार या विद्यार्थी नेत्याचा राजकारणातला प्रवेश इथूनच झाला. त्यानंतर हे विद्यापीठ अधिक चर्चेत आले. प्रत्येक विद्यार्थ्याला या विद्यापीठाशी जोडून घ्यावे असे वाटायला लागले. आपला विश्वास बसणार नाही; पण नांदेडसारख्या छोट्या शहरातूनही अनेक विद्यार्थी केवळ आकर्षणापोटी या विद्यापीठात दाखल झाले आहेत. देशाच्या राजधानीत आणि तेही जेएनयू या नावाची विद्यापीठीय डिग्री घेण्यासाठी खेड्यापाड्यातली मुलं जेव्हा या विद्यापीठात येतात तेव्हा या घटनेलाही अनेक अर्थाने महत्त्व प्राप्त होते. डाव्या आणि उजव्या विचारधारेचा संघर्ष ही इथली नित्याची बाब. पण कधीकाळी केवळ निकोप राजकीय विरोध करणारे लोक आज मात्र थेट एकमेकांवर सशस्त्र हल्ला करतात. अगदी सराईत गुंडासारखा. त्यावेळी मात्र या घटनेचे गांभीर्य अधिक वाढते. विद्यार्थी संघटनांची आंदोलने ही भारतीय राजकारणात नवी बाब नसली तरी या आंदोलनाने जे हिंसक वळण घेतले आहे ते अत्यंत भीषण आहे. सात-आठ वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातही या विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत लक्षणीय होता. दरम्यानच्या काळात आपल्या देशात मोठे राजकीय सत्तांतर झाले. डाव्यांची पिछेहाट होऊन उजवे सत्तेत आले. सत्ता कुणाचीही असो जेएनयूची सरकारविरोधी प्रतिमा मात्र आजही कायम आहे. नव्या शासनकर्त्यांनी सत्तेत येताना दिलेली आश्वासने केवळ ‘आश्वासनेच’ ठरत असल्याची शंका विद्यार्थ्यांना यायला लागली आणि यातूनच एक सरकारविरोधी आवाज अधिक तीव्र होवू लागला.

हा आवाज तीव्र का होत आहे ? याची कारणे शोधण्याऐवजी या आवाजालाच दाबण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. परिणामी हा आवाज काही दबत नाही. उलट त्याचे पडसाद देशभर उमटत राहतात. प्रजासत्ताक राज्यव्यवस्था असलेल्या देशात अशा घटना घडणे स्वाभाविक मानले तरी त्या घटना सातत्याने घडणार असतील तर त्यांचे गांभीर्य आणि एकूणच अनिष्ट परीणाम लक्षात घ्यायला हवे. सध्याच्या काळातल्या गतिमान माध्यमामुळेही अशा घटना वेगाने लोकांपर्यंत पोहचतात आणि त्याविषयी क्रिया प्रतिक्रियांचे पडसाद सर्वत्र उमटतात. आपल्यातल्या सहिष्णुतेचा, सलोख्याचा आणि एकूणच सामाजिकतेचा दिवसेंदिवस संकोच होत चालल्यामुळे अशा घटनांना मोठेच खतपाणी मिळते. विद्यार्थ्यांच्या चर्चाविश्वात राजकारण असण्यात काही गैर नाही; पण केवळ राजकारणच असेल तर मात्र ही चिंतेची बाब आहे. नव्या सरकारने देशाला काही स्वप्न दाखवले. हे स्वप्न विकासाचे होते, स्थैयाचे होते. भ्रष्टाचारमुक्त देशाचे होते आणि सर्वात महत्त्वाचे गरिबी मुक्तीचे, रोजगाराचे होते. पण दुर्दैवाने अनेक वर्ष उलटूनही तसे काही विशेष घडण्याचे चित्र नाही. त्यामुळे जनमत विरोधात जाणे स्वाभाविकच आहे. अमर्याद आर्थिक सुबत्तेचे स्वप्न पाहिलेला, पण त्या स्वप्नापासून खूप दूर असलेल्या पिढीचा भ्रमनिरास झाला की ती पिढी सरकारविरोधी भूमिका घेऊ लागते. सध्याही तसेच घडले आहे. बरं हा भ्रमनिरास केवळ बेरोजगारी व तत्सम बाबींचा आहे असेही नाही, समताधिष्ठित समाजाच्या स्वप्नालाही तडा जाऊ लागला किंवा आपण असुरक्षित असल्याची भावना मनात रुजत गेली की त्याची प्रतिक्रिया उमटतेच.

देशाने मागच्या काही वर्षात अशा गोष्टी अनुभवल्या आहेत. त्यामुळे एक टोकाची अस्वस्थता समाजात भरून आहे. विद्यार्थी त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. आधी म्हटल्याप्रमाणे डाव्या उजव्यांचा संघर्ष हा केवळ माणसांचा नाही, तर विशिष्ट विचारधारेचा संघर्ष आहे. जो कधीही संपणार नाही. आपले भवितव्य अनिश्चित असल्याची प्रखर जाणीव नव्या पिढीला झालीय. नव्या काळाने अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे केले आहेत अशावेळी जात आणि धर्मांचे पारंपरिक राजकारण खेळून राज्यकर्ते विद्यार्थ्यांना बहकवत आहेत. आणि जेएनयूसारखे संवेदनशील ठिकाण तर सर्वांसाठीच प्रसिद्धीचं एक प्रशस्त माध्यम आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक कुचंबना होणार नाही, इतक्या माफक खर्चात त्यांना शिक्षण द्यायला हवे. त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल आश्वासीत करायला हवे. पण तसे न करता त्यांच्या नेतृत्वावर हल्ला करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम सुरु आहे. एका आंदोलनाच्या वेळी मोर्चा उधळून लावण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी विद्यार्थांना बेदम मारहाण केली ही घटना निषेधार्ह आणि निंदनीय आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा देशात राजकीय लढाईला प्रारंभ झाला. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातूनही निषेधाचे सूर उमटले. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध केला आणि विद्यार्थ्यांनी नैतिक पाठबळ दिले. प्रख्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने तर थेट विद्यार्थ्यांच्या आंदोलनातच उडी घेतली. तिच्या मौन उपस्थितीमुळे या आंदोलनाला अधिक व्यापक प्रसिद्धी मिळाली. खरंतर दीपिका ही भारतीय स्तरावरची अत्यंत आघाडीची अभिनेत्री. तिच्या या छोट्याशा कृतीने माध्यमविश्व आणि सांस्कृतिक क्षेत्र ढवळून निघाले. खरे तर तिने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तरीही तिचे धीरगंभीर मौन मात्र खूप काही सांगणारे होते. थेट विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्या बाजूने उभे राहणे ही घटना साधी नाही. कारण सेलिब्रिटींनी केलेल्या कोणत्याही कृतीचे अथवा भूमिकेचे बरेवाईट परिणाम होण्याची मोठी शक्यता आपल्या देशात असते. हे माहीत असूनही दीपिका आली, याचा अर्थ असा की तिने ही कृती अजाणतेपणाने अजिबात केलेली नाही.

पण तिच्या येण्यावरून ज्या उलटसुलट प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली, ते पाहता आपण काळाच्या किती संवेदनशील टोकावर उभे आहोत याची प्रचीती येते. सेलिब्रिटीच्या प्रत्येक कृतीतून आपण काहीतरी राजकीय अर्थ काढत असतो. याही वेळी तसे घडले. मागच्या दशक दीड दशकाच्या करिअरमध्ये दीपिकाने यापूर्वी कधीच कोणतेही राजकीय विधान केल्याची चर्चा नाही. मग तिला आताच विद्यार्थ्यांना समर्थन द्यावे असे का वाटले? तर याचेही उत्तर सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांनी शोधले आणि तिच्याविषयी बर्‍या वाईट चर्चेचा आखाडा रंगला.

‘छपाक’ हा दीपिकाचा नवा सिनेमा प्रदर्शित झालाय. जो सिनेमा अ‍ॅसिड हल्ल्यातील लक्ष्मी अगरवाल या युवतीच्या जीवनावर आधारलेला आहे. म्हणजे दीपिकाचे इथे येणे या पार्श्वभूमीवर अनेकांना खटकले. प्रसिद्धीचा हा स्टंट असल्याचे अनेकांनी म्हटले. तर अनेकांनी तिच्या या भूमिकेचे जोरदार स्वागतही केले. टीकाकारांनी मात्र अत्यंत असभ्य भाषेत तिला ट्रोल केले. अत्यंत घाणेरड्या शब्दात तिची निर्भत्सना केली. याचा अर्थ हा की, एखाद्या गटाला आवडणारी कृती आपल्याकडून घडली नाही तर त्या कृतीचा निषेध हा वैचारिक प्रतिवादातून नव्हे; तर अत्यंत असमंजस आणि भाषिक हिंसेतून केला जात आहे. हे या काळाचे एक मोठे लक्षण आहे. दीपिकाच्या या भूमिकेतून अनेक हॅशटॅग व्हयरल झाले. ‘स्टॅन्ड विथ दीपिका’ पासून ‘कॅन्सल्ड छपाक’ पर्यंत प्रतिक्रिया उमटल्या. हे सगळं पाहिलं की आपण वैचारिक प्रगल्भताच गमावून बसलो आहोत की काय असे वाटते. विवेकशील माणसे नेहमीच एकमेकांच्या मदतीला धावून जातात. विशिष्ट स्वरुपाची नैतिक भूमिका घेऊन ते अन्यायग्रस्तांच्या मागे उभे राहतात. त्यांना बळ देतात किंवा त्यांच्या आंदोलनाला प्रोत्साहन देतात. परस्पर सौहार्दासाठी लोकशाही राष्ट्रामध्ये असे घडणे स्वाभाविक असते. म्हणून केवळ पूर्वग्रहाच्या राजकीय नजरेतून या घटनेची चिकित्सा करणे म्हणजे आपण आपल्यातली सुसंस्कृतता गमावून बसण्यासारखे आहे. कोणत्याही घटनेत अवाजवी हस्तक्षेप करू पाहणार्‍या शासनकर्त्यांनी आपला विवेकी उतावळेपणा जरा दूर ठेवायला हवा. शेवटी हे विद्यार्थी आपलेच आहेत. त्यांचे प्रश्नही आपलेच आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्याकडे अधिक लक्ष दिले तर आपल्या आक्रसत चाललेल्या अवकाशाला अधिक व्यापक करता येईल.

दुसर्‍या एका घटनेने आपला महाराष्ट्र ढवळून निघालाय. मागच्या काही दिवसांपूर्वी भाजपचे एक दिल्लीतील आक्रमक नेते जयभगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हा कार्यक्रम भाजप कार्यालयातच आणि भाजप नेत्यांच्याच प्रमुख उपस्थितीत झाला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना सदर पुस्तकात करण्यात आल्याचे पाहून शिवप्रेमी भडकले. ही तुलना अगदीच अप्रस्तुत आणि राजकीय हेतूने करण्यात आल्यामुळे सर्वत्र टीकेचा एक टोकदार उच्चार होत आहे. छत्रपतींचे हिमालयाएवढे जागतिक कर्तृत्व आणि मोदींची पंतप्रधान म्हणून सहा वर्षे, ही तुलनाच अत्यंत गैर आणि अवाजवी स्वरुपाची आहे. स्वाभाविकच या घटनेचे तात्काळ पडसाद महाराष्ट्रात उमटले.

महाराष्ट्रातले सध्याचे राजकारण हे केवळ राजकीय गरजेतून आणि भाजप विरोधातूनच आकाराला आलेले असल्यामुळे सोयीने डावी भूमिका घेणार्‍या या पक्षांच्या हातात आयताच मुद्दा येऊन पडला आणि त्याचा पुरेपूर वापर भाजपविरोधकांनी केला. खरेतर सत्तेत असलेला व्यक्तींची चरित्रे लिहिण्याची मोठी परंपरा जगभरात आहे. पण अशी चरित्रे साकारताना तुमचे हेतू बेगडी असतील तर मात्र वाचक आणि समाज अशा कलाकृती स्वीकारत नाहीत हेही अनेकदा सिध्द झाले आहे. मागच्या काही वर्षात अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार, ए.पी.जे. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील यांच्यावर अनेक पुस्तके लिहिली गेली. अगदी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचीही अनेक चरित्रात्मक पुस्तके जगभरात प्रसिद्ध झाली. कारण हे सगळे चेहरे देशाच्या राजकारणातले चर्चित चेहरे आहेत. त्यामुळे त्यांचा जीवन परिचय नव्या पिढीला व्हावा असे अनेकांना वाटते. अनुकूल सरकार आले की आपापल्या विचारधारेची पुस्तके मात्र अधिक प्रकाशित होतात.

नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि डाव्यांशी मोठा संघर्ष करून देशातली सत्ता हस्तगत केली आणि आपला कार्यकाळ पूर्णही केला. या कार्यकाळात अनेक बर्‍या वाईट घटना घडल्या. ज्या घटनांनी आपल्या एकूणच सलोख्याला बाधा आणली. तसेच काही निर्णयाचे दूरगामी परिणामही देशाने भोगले. त्यामुळेच भाजपविरोधाचा स्वर अधिक तीव्र होत गेला. म्हणजे २०१४ ला जी माध्यमे मोदी समर्थक होती त्याच माध्यमांनी विरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केली. अगदी अंबानी सारख्या उद्योगपतीनेही विरोधाचा प्रतिकात्मक सूर आळवला. सोशल मीडियाने मोदींना भयंकर ट्रोल केले पण एवढे सगळे घडूनही पुन्हा एकदा मोदींनी आपली हुकुमत सिद्ध केली. राजकारणाच्या दुसर्‍या टर्ममध्ये कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदींनी घेतला. याच मुद्याला राजकीय मुद्दा बनवून काही राज्यात निवडणुका लढवण्यात आल्या. कुठे यश मिळाले तर कुठे अपयश. पण धडाडीच्या निर्णयाची मालिका मोदींनी कायम ठेवली. त्यांची ही सगळी देदीप्यमान कामगिरी लक्षणीय आहे, हे नाकारण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे त्यांच्याविषयीची अनेक चरित्रात्मक पुस्तके मागच्या काही वर्षात बाजारात आली.

अर्थात त्यांचे चरित्र साकारणार्‍या सगळ्याच लेखकांचे हेतू अशावेळी फार शुद्ध होते असे समजण्याचे काही कारण नाही. सत्ताधिशाला चरित्रनायक बनवताना त्यात लेखकाचा स्वार्थीपणा दडलेला असतोच. या स्वार्थाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. अर्थात असे असले तरी कुठलेही पुस्तक हे आपल्या समाजाच्या सांस्कृतिक इतिहासाचा दस्तावेज असते. त्यामुळे अशी पुस्तके जर विशिष्ट हेतूने प्रेरित असतील तर एक चुकीचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्याची मोठी शक्यता असते.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकामुळे आपल्या सांस्कृतिक जीवनात निर्माण झालेले वादळ हे सांस्कृतिक क्षेत्रातील सत्ताविरोधाचे वादळ आहे. खरे तर मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी पहिल्यांदाच होतेय असे नाही. साधारण सहा महिन्यांपूर्वी कलम ३७० हटवल्यानंतर भाजप खासदार विजय गोयल यांनी ‘नरेंद्र मोदी भारताचे आणखी एक शिवाजी’ असे म्हटले होते. विशेष म्हणजे त्यांनी हे विधान सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान सरकारचे कौतुक करताना केले होते. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी वाईट शक्तीविरोधात लढाई केली होती त्याचप्रमाणे दहशतवाद आणि भ्रष्टाचाराविरुद्ध मोदींची लढाई निरंतर सुरु असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र या विधानावरून कुठेच गदारोळ झाला नव्हता. यावेळी मात्र पुस्तकावरून वाद झाला. जयभगवान गोयल हे पूर्वाश्रमीचे शिवसेना कार्यकर्ते आणि सध्या भाजपचे वरिष्ठ नेते. मोदींवर त्यांचे प्रेम असण्यात गैर काही नाही. मात्र हे प्रेम व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्याचा त्यांना झालेला मोह मात्र अनाकलनीय म्हणावा लागेल.

ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या आपल्या पुस्तिकेत न्या. रानड्यांचे शिवाजी महाराजांविषयीचे एक अवतरण उदृत केले आहे, ते असे, ‘जनतेच्या सच्च्या पुढार्‍यांजवळ जी देशातील सर्वोकृष्ट व्यक्तींना आपल्याकडे आकर्षित करण्याची शक्ती असते ती शिवाजींजवळ मोठ्या प्रमाणात होती. अशी व्यक्ती लुटारुंकडे व धर्मवेड्या पुढार्‍यांजवळ नसते. वर्ग, जात, पंथ आणि वर्ण दूर सारून समाजातील सर्वोकृष्ट माणसे शिवाजींभोवती गोळा होत असत. कारण समाजाच्या आशा-आकांक्षांचे अगदी उत्कृट स्वरूपामध्ये शिवाजी प्रतिनिधित्व करत होता.’ रानड्यांचे हे विधान तुलनेच्या स्वरुपात जरी समोर ठेवले तरी महाराजांचा लौकिक किती थोर होता हे लक्षात येऊ शकेल. पानसरे यांनी ‘राज्य संस्थापक’ म्हणून केलेल्या गौरवाचाही इथे निर्देश करायला हवा. ते म्हणतात, ‘पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी हा कुणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसाहक्काने बसलेला आयतोबा नव्हता. आयत्या पिठावर रेघोट्या उठवणे सोपे असते. त्यात फारसे कौतुकास्पद काही नसते. वारसाहक्काने राजे बनलेले अनेक होऊन गेले. शिवाजी वारसाहक्काने राजा बनले नव्हते. त्याने राज्य ‘निर्माण’ केले. तो राज्य -संस्थापक होता. इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे यात खूप फरक आहे’

जयभगवान गोयल यांनी एवढी जरी गोष्ट लक्षात घेतली असती तरी त्यांनी ही तुलना टाळली असती. पण राजकारणी लेखक अधिक भावनिकतेतून अशा विषयाची मांडणी करू पाहतात आणि त्यांची मोठीच फसगत होते. व्यापक समाजभान आणि व्यक्तिगत आस्था यातला फरक कोणत्याही लेखकाला कळायला हवा. मोदींच्या कर्तृत्वाची शिवाजी महाराजांशी कुठल्याही अर्थाने तुलना करून असा चुकीचा इतिहास नोंदवणे ही कृतीच मुळात निषेधार्ह आहे. कोणताही चांगला लेखक हा सत्याचा शोध घेत असतो, पण सत्याचा असा विपर्यास झाला की त्याला त्याची किंमत चुकवावी लागते. इथे तेच घडले आहे. मोदींवर असलेली निस्सिम श्रद्धा व्यक्त करण्यासाठी चातुर्याने लेखकाने खेळी खेळली असल्याचे इथे स्पष्ट दिसते. यानिमित्ताने गोयल सर्वदूर पोहचले आहेत. अर्थात गोयल हे काही स्वयंप्रज्ञ लेखक नाहीत किंवा तत्त्वज्ञ नाहीत. त्यामुळे लेखक म्हणून मान्यता मिळवण्याचा त्यांचा हेतू नव्हताच. हेतू होता तो मोदींच्या अधिक जवळ जाण्याचा. आणि तो हेतू त्यांचा साध्य झाला आहे. स्वत:चे उदात्तीकरण करून घ्यायला मोदींनाही ते हवेच आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्रात एक राजकीय युद्ध सुरु झाले आहे. पुस्तक मागे घेतल्यानंतर हा वाद थांबायला हवा; पण तसे चित्र सध्या तरी दिसत नाहीय. या वादाचा राजकीय लाभ घेणारे अनेक जण रोज चर्चेच्या मैदानात उड्या मारत आहेत. महापुरुष, जात, धर्म, प्रदेश आणि समूहाच्या अस्मिता या भविष्यात आपल्याला अधिक छळणार आहेत. हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक तीव्र होत जाणार आहे. अशावेळी आपण आपला मेंदू ताब्यात ठेवला नाही तर सतत अशा प्रश्नांना आपल्याला सामोरे जावे लागेल. धर्मवादी लोक असे प्रश्न पेटत ठेवत असतात. विवेकी माणसांनी या घटनेमागचे सांस्कृतिक राजकारण समजून घ्यायला हवे.

हा आवाज तीव्र का होत आहे ? याची कारणे शोधण्याऐवजी या आवाजालाच दाबण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. परिणामी हा आवाज काही दबत नाही. उलट त्याचे पडसाद देशभर उमटत राहतात. प्रजासत्ताक राज्यव्यवस्था असलेल्या देशात अशा घटना घडणे स्वाभाविक मानले तरी त्या घटना सातत्याने घडणार असतील तर त्यांचे गांभीर्य आणि एकूणच अनिष्ट परीणाम लक्षात घ्यायला हवे. सध्याच्या काळातल्या गतिमान माध्यमामुळेही अशा घटना वेगाने लोकांपर्यंत पोहचतात आणि त्याविषयी क्रिया प्रतिक्रियांचे पडसाद सर्वत्र उमटतात. आपल्यातल्या सहिष्णुतेचा, सलोख्याचा आणि एकूणच सामाजिकतेचा दिवसेंदिवस संकोच होत चालल्यामुळे अशा घटनांना मोठेच खतपाणी मिळते. विद्यार्थ्यांच्या चर्चाविश्वात राजकारण असण्यात काही गैर नाही; पण केवळ राजकारणच असेल तर मात्र ही चिंतेची बाब आहे. नव्या सरकारने देशाला काही स्वप्न दाखवले. हे स्वप्न विकासाचे होते, स्थैयाचे होते. भ्रष्टाचारमुक्त देशाचे होते आणि सर्वात महत्त्वाचे गरिबी मुक्तीचे, रोजगाराचे होते. पण दुर्दैवाने अनेक वर्ष उलटूनही तसे काही विशेष घडण्याचे चित्र नाही. त्यामुळे जनमत विरोधात जाणे स्वाभाविकच आहे. अमर्याद आर्थिक सुबत्तेचे स्वप्न पाहिलेला, पण त्या स्वप्नापासून खूप दूर असलेल्या पिढीचा भ्रमनिरास झाला की ती पिढी सरकारविरोधी भूमिका घेऊ लागते. सध्याही तसेच घडले आहे. बरं हा भ्रमनिरास केवळ बेरोजगारी व तत्सम बाबींचा आहे असेही नाही, समताधिष्ठित समाजाच्या स्वप्नालाही तडा जाऊ लागला किंवा आपण असुरक्षित असल्याची भावना मनात रुजत गेली की त्याची प्रतिक्रिया उमटतेच.

देशाने मागच्या काही वर्षात अशा गोष्टी अनुभवल्या आहेत. त्यामुळे एक टोकाची अस्वस्थता समाजात भरून आहे. विद्यार्थी त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. आधी म्हटल्याप्रमाणे डाव्या उजव्यांचा संघर्ष हा केवळ माणसांचा नाही, तर विशिष्ट विचारधारेचा संघर्ष आहे. जो कधीही संपणार नाही. आपले भवितव्य अनिश्चित असल्याची प्रखर जाणीव नव्या पिढीला झालीय. नव्या काळाने अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे केले आहेत अशावेळी जात आणि धर्मांचे पारंपरिक राजकारण खेळून राज्यकर्ते विद्यार्थ्यांना बहकवत आहेत. आणि जेएनयूसारखे संवेदनशील ठिकाण तर सर्वांसाठीच प्रसिद्धीचं एक प्रशस्त माध्यम आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक कुचंबना होणार नाही, इतक्या माफक खर्चात त्यांना शिक्षण द्यायला हवे. त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल आश्वासीत करायला हवे. पण तसे न करता त्यांच्या नेतृत्वावर हल्ला करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम सुरु आहे. एका आंदोलनाच्या वेळी मोर्चा उधळून लावण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी विद्यार्थांना बेदम मारहाण केली ही घटना निषेधार्ह आणि निंदनीय आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा देशात राजकीय लढाईला प्रारंभ झाला. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातूनही निषेधाचे सूर उमटले. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध केला आणि विद्यार्थ्यांनी नैतिक पाठबळ दिले. प्रख्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने तर थेट विद्यार्थ्यांच्या आंदोलनातच उडी घेतली. तिच्या मौन उपस्थितीमुळे या आंदोलनाला अधिक व्यापक प्रसिद्धी मिळाली. खरंतर दीपिका ही भारतीय स्तरावरची अत्यंत आघाडीची अभिनेत्री. तिच्या या छोट्याशा कृतीने माध्यमविश्व आणि सांस्कृतिक क्षेत्र ढवळून निघाले. खरे तर तिने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तरीही तिचे धीरगंभीर मौन मात्र खूप काही सांगणारे होते. थेट विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्या बाजूने उभे राहणे ही घटना साधी नाही. कारण सेलिब्रिटींनी केलेल्या कोणत्याही कृतीचे व भूमिकेचे बरेवाईट परिणाम होण्याची मोठी शक्यता आपल्या देशात असते. हे माहीत असूनही दीपिका आली, याचा अर्थ असा की तिने ही कृती अजाणतेपणाने अजिबात केलेली नाही.

पण तिच्या येण्यावरून ज्या उलटसुलट प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली, ते पाहता आपण काळाच्या किती संवेदनशील टोकावर उभे आहोत याची प्रचीती येते. सेलिब्रिटीच्या प्रत्येक कृतीतून आपण काहीतरी राजकीय अर्थ काढत असतो. याही वेळी तसे घडले. मागच्या दशक दीड दशकाच्या करिअरमध्ये दीपिकाने यापूर्वी कधीच कोणतेही राजकीय विधान केल्याची चर्चा नाही. मग तिला आताच विद्यार्थ्यांना समर्थन द्यावे असे का वाटले? तर याचेही उत्तर सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांनी शोधले आणि तिच्याविषयी बर्‍या वाईट चर्चेचा आखाडा रंगला.

‘छपाक’ हा दीपिकाचा नवा सिनेमा प्रदर्शित झालाय. जो सिनेमा अ‍ॅसिड हल्ल्यातील लक्ष्मी अगरवाल या युवतीच्या जीवनावर आधारलेला आहे. म्हणजे दीपिकाचे इथे येणे या पार्श्वभूमीवर अनेकांना खटकले. प्रसिद्धीचा हा स्टंट असल्याचे अनेकांनी म्हटले. तर अनेकांनी तिच्या या भूमिकेचे जोरदार स्वागतही केले. टीकाकारांनी मात्र अत्यंत असभ्य भाषेत तिला ट्रोल केले. अत्यंत घाणेरड्या शब्दात तिची निर्भत्सना केली. याचा अर्थ हा की, एखाद्या गटाला आवडणारी कृती आपल्याकडून घडली नाही तर त्या कृतीचा निषेध हा वैचारिक प्रतिवादातून नव्हे; तर अत्यंत असमंजस आणि भाषिक हिंसेतून केला जात आहे. हे या काळाचे एक मोठे लक्षण आहे. दीपिकाच्या या भूमिकेतून अनेक हॅशटॅग व्हयरल झाले. ‘स्टॅन्ड विथ दीपिका’ पासून ‘कॅन्सल्ड छपाक’ पर्यंत प्रतिक्रिया उमटल्या. हे सगळं पाहिलं की आपण वैचारिक प्रगल्भताच गमावून बसलो आहोत की काय असे वाटते. विवेकशील माणसे नेहमीच एकमेकांच्या मदतीला धावून जातात. विशिष्ट स्वरुपाची नैतिक भूमिका घेऊन ते अन्यायग्रस्तांच्या मागे उभे राहतात. त्यांना बळ देतात किंवा त्यांच्या आंदोलनाला प्रोत्साहन देतात. परस्पर सौहार्दासाठी लोकशाही राष्ट्रामध्ये असे घडणे स्वाभाविक असते. म्हणून केवळ पूर्वग्रहाच्या राजकीय नजरेतून या घटनेची चिकित्सा करणे म्हणजे आपण आपल्यातली सुसंस्कृतता गमावून बसण्यासारखे आहे. कोणत्याही घटनेत अवाजवी हस्तक्षेप करू पाहणार्‍या शासनकर्त्यांनी आपला विवेकी उतावळेपणा जरा दूर ठेवायला हवा. शेवटी हे विद्यार्थी आपलेच आहेत. त्यांचे प्रश्नही आपलेच आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्याकडे अधिक लक्ष दिले तर आपल्या आक्रसत चाललेल्या अवकाशाला अधिक व्यापक करता येईल.

दुसर्‍या एका घटनेने आपला महाराष्ट्र ढवळून निघालाय. मागच्या काही दिवसांपूर्वी भाजपचे एक दिल्लीतील आक्रमक नेते जयभगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हा कार्यक्रम भाजप कार्यालयातच आणि भाजप नेत्यांच्याच प्रमुख उपस्थितीत झाला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना सदर पुस्तकात करण्यात आल्याचे पाहून शिवप्रेमी भडकले. ही तुलना अगदीच अप्रस्तुत आणि राजकीय हेतूने करण्यात आल्यामुळे सर्वत्र टीकेचा एक टोकदार उच्चार होत आहे. छत्रपतींचे हिमालयाएवढे जागतिक कर्तृत्व आणि मोदींची पंतप्रधान म्हणून सहा वर्षे, ही तुलनाच अत्यंत गैर आणि अवाजवी स्वरुपाची आहे. स्वाभाविकच या घटनेचे तात्काळ पडसाद महाराष्ट्रात उमटले.

महाराष्ट्रातले सध्याचे राजकारण हे केवळ राजकीय गरजेतून आणि भाजप विरोधातूनच आकाराला आलेले असल्यामुळे सोयीने डावी भूमिका घेणार्‍या या पक्षांच्या हातात आयताच मुद्दा येऊन पडला आणि त्याचा पुरेपूर वापर भाजपविरोधकांनी केला. खरेतर सत्तेत असलेला व्यक्तींची चरित्रे लिहिण्याची मोठी परंपरा जगभरात आहे. पण अशी चरित्रे साकारताना तुमचे हेतू बेगडी असतील तर मात्र वाचक आणि समाज अशा कलाकृती स्वीकारत नाहीत हेही अनेकदा सिध्द झाले आहे. मागच्या काही वर्षात अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार, ए.पी.जे. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील यांच्यावर अनेक पुस्तके लिहिली गेली. अगदी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचीही अनेक चरित्रात्मक पुस्तके जगभरात प्रसिद्ध झाली. कारण हे सगळे चेहरे देशाच्या राजकारणातले चर्चित चेहरे आहेत. त्यामुळे त्यांचा जीवन परिचय नव्या पिढीला व्हावा असे अनेकांना वाटते. अनुकूल सरकार आले की आपापल्या विचारधारेची पुस्तके मात्र अधिक प्रकाशित होतात.

नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि डाव्यांशी मोठा संघर्ष करून देशातली सत्ता हस्तगत केली आणि आपला कार्यकाळ पूर्णही केला. या कार्यकाळात अनेक बर्‍या वाईट घटना घडल्या. ज्या घटनांनी आपल्या एकूणच सलोख्याला बाधा आणली. तसेच काही निर्णयाचे दूरगामी परिणामही देशाने भोगले. त्यामुळेच भाजपविरोधाचा स्वर अधिक तीव्र होत गेला. म्हणजे २०१४ ला जी माध्यमे मोदी समर्थक होती त्याच माध्यमांनी विरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केली. अगदी अंबानी सारख्या उद्योगपतीनेही विरोधाचा प्रतिकात्मक सूर आळवला. सोशल मीडियाने मोदींना भयंकर ट्रोल केले पण एवढे सगळे घडूनही पुन्हा एकदा मोदींनी आपली हुकुमत सिद्ध केली. राजकारणाच्या दुसर्‍या टर्ममध्ये कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदींनी घेतला. याच मुद्याला राजकीय मुद्दा बनवून काही राज्यात निवडणुका लढवण्यात आल्या. कुठे यश मिळाले तर कुठे अपयश. पण धडाडीच्या निर्णयाची मालिका मोदींनी कायम ठेवली. त्यांची ही सगळी देदीप्यमान कामगिरी लक्षणीय आहे, हे नाकारण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे त्यांच्याविषयीची अनेक चरित्रात्मक पुस्तके मागच्या काही वर्षात बाजारात आली. अर्थात त्यांचे चरित्र साकारणार्‍या सगळ्याच लेखकांचे हेतू अशावेळी फार शुद्ध होते असे समजण्याचे काही कारण नाही. सत्ताधिशाला चरित्रनायक बनवताना त्यात लेखकाचा स्वार्थीपणा दडलेला असतोच. या स्वार्थाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. अर्थात असे असले तरी कुठलेही पुस्तक हे आपल्या समाजाच्या सांस्कृतिक इतिहासाचा दस्तावेज असते. त्यामुळे अशी पुस्तके जर विशिष्ट हेतूने प्रेरित असतील तर एक चुकीचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्याची मोठी शक्यता असते.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकामुळे आपल्या सांस्कृतिक जीवनात निर्माण झालेले वादळ हे सांस्कृतिक क्षेत्रातील सत्ताविरोधाचे वादळ आहे. खरे तर मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी पहिल्यांदाच होतेय असे नाही. साधारण सहा महिन्यांपूर्वी कलम ३७० हटवल्यानंतर भाजप खासदार विजय गोयल यांनी ‘नरेंद्र मोदी भारताचे आणखी एक शिवाजी’ असे म्हटले होते. विशेष म्हणजे त्यांनी हे विधान सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान सरकारचे कौतुक करताना केले होते. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी वाईट शक्तीविरोधात लढाई केली होती त्याचप्रमाणे दहशतवाद आणि भ्रष्टाचाराविरुद्ध मोदींची लढाई निरंतर सुरु असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र या विधानावरून कुठेच गदारोळ झाला नव्हता. यावेळी मात्र पुस्तकावरून वाद झाला. जयभगवान गोयल हे पूर्वाश्रमीचे शिवसेना कार्यकर्ते आणि सध्या भाजपचे वरिष्ठ नेते. मोदींवर त्यांचे प्रेम असण्यात गैर काही नाही. मात्र हे प्रेम व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्याचा त्यांना झालेला मोह मात्र अनाकलनीय म्हणावा लागेल.

ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या आपल्या पुस्तिकेत न्या. रानड्यांचे शिवाजी महाराजांविषयीचे एक अवतरण उदृत केले आहे, ते असे, ‘जनतेच्या सच्च्या पुढार्‍यांजवळ जी देशातील सर्वोकृष्ट व्यक्तींना आपल्याकडे आकर्षित करण्याची शक्ती असते ती शिवाजींजवळ मोठ्या प्रमाणात होती. अशी व्यक्ती लुटारुंकडे व धर्मवेड्या पुढार्‍यांजवळ नसते. वर्ग, जात, पंथ आणि वर्ण दूर सारून समाजातील सर्वोकृष्ट माणसे शिवाजींभोवती गोळा होत असत. कारण समाजाच्या आशा-आकांक्षांचे अगदी उत्कृट स्वरूपामध्ये शिवाजी प्रतिनिधित्व करत होता.’ रानड्यांचे हे विधान तुलनेच्या स्वरुपात जरी समोर ठेवले तरी महाराजांचा लौकिक किती थोर होता हे लक्षात येऊ शकेल. पानसरे यांनी ‘राज्य संस्थापक’ म्हणून केलेल्या गौरवाचाही इथे निर्देश करायला हवा. ते म्हणतात, ‘पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी हा कुणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसाहक्काने बसलेला आयतोबा नव्हता. आयत्या पिठावर रेघोट्या उठवणे सोपे असते. त्यात फारसे कौतुकास्पद काही नसते. वारसाहक्काने राजे बनलेले अनेक होऊन गेले. शिवाजी वारसाहक्काने राजा बनले नव्हते. त्याने राज्य ‘निर्माण’ केले. तो राज्य-संस्थापक होता. इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे यात खूप फरक आहे’

जयभगवान गोयल यांनी एवढी जरी गोष्ट लक्षात घेतली असती तरी त्यांनी ही तुलना टाळली असती. पण राजकारणी लेखक अधिक भावनिकतेतून अशा विषयाची मांडणी करू पाहतात आणि त्यांची मोठीच फसगत होते. व्यापक समाजभान आणि व्यक्तिगत आस्था यातला फरक कोणत्याही लेखकाला कळायला हवा. मोदींच्या कर्तृत्वाची शिवाजी महाराजांशी कुठल्याही अर्थाने तुलना करून असा चुकीचा इतिहास नोंदवणे ही कृतीच मुळात निषेधार्ह आहे. कोणताही चांगला लेखक हा सत्याचा शोध घेत असतो, पण सत्याचा असा विपर्यास झाला की त्याला त्याची किंमत चुकवावी लागते. इथे तेच घडले आहे. मोदींवर असलेली निस्सिम श्रद्धा व्यक्त करण्यासाठी चातुर्याने लेखकाने खेळी खेळली असल्याचे इथे स्पष्ट दिसते. यानिमित्ताने गोयल सर्वदूर पोहचले आहेत. अर्थात गोयल हे काही स्वयंप्रज्ञ लेखक नाहीत किंवा तत्त्वज्ञ नाहीत. त्यामुळे लेखक म्हणून मान्यता मिळवण्याचा त्यांचा हेतू नव्हताच. हेतू होता तो मोदींच्या अधिक जवळ जाण्याचा. आणि तो हेतू त्यांचा साध्य झाला आहे. स्वत:चे उदात्तीकरण करून घ्यायला मोदींनाही ते हवेच आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्रात एक राजकीय युद्ध सुरु झाले आहे. पुस्तक मागे घेतल्यानंतर हा वाद थांबायला हवा; पण तसे चित्र सध्या तरी दिसत नाहीय. या वादाचा राजकीय लाभ घेणारे अनेक जण रोज चर्चेच्या मैदानात उड्या मारत आहेत. महापुरुष, जात, धर्म, प्रदेश आणि समूहाच्या अस्मिता या भविष्यात आपल्याला अधिक छळणार आहेत. हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक तीव्र होत जाणार आहे. अशावेळी आपण आपला मेंदू ताब्यात ठेवला नाही तर सतत अशा प्रश्नांना आपल्याला सामोरे जावे लागेल. धर्मवादी लोक असे प्रश्न पेटत ठेवत असतात. विवेकी माणसांनी या घटनेमागचे सांस्कृतिक राजकारण समजून घ्यायला हवे.

पी. विठ्ठल 

First Published on: January 19, 2020 1:47 AM
Exit mobile version