Hindu Shastra : अक्षय तृतीयेला ५० वर्षांनी अद्भूत संयोग ; अभिजीत मुहूर्तावर करा हे काम

Hindu Shastra : अक्षय तृतीयेला ५० वर्षांनी अद्भूत संयोग ; अभिजीत मुहूर्तावर करा हे काम

वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो. या वर्षी ३ मे रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय तृतीया या वेळी मंगळ रोहिणी नक्षत्राच्या शुभ योगात साजरी केली जाईल. अशा शुभ योगात अक्षय तृतीयेचा सण साजरा करण्याचा हा सर्वोत्तम योग जवळपास ३० वर्षांनंतर आलेला आहे. इतकंच नव्हे तर ५० वर्षानंतर ग्रहांची ही विशेष स्थिती पाहायला मिळणार आहे. ज्योतिषांच्या मते, वैशाख शुक्ल तृतीयेला जवळपास ५० वर्षानंतर दोन ग्रह उच्च राशीमध्ये विद्यमान होतील.आणि दोन प्रमुख ग्रह स्वराशीमध्ये विराजमान होतील. शुभ योग आणि ग्रहांच्या विशेष स्थितीमध्ये अक्षय तृतीयेला दान केल्याने अखंड पुण्य प्राप्त होईल.

या दिवशी पाण्याने भरलेल्या तांब्यावर फळं ठेऊन दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी अभिजीत मुहूर्तावर कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य तुम्ही करू शकता. या दिवशी मंगळवार आणि रोहिणी नक्षत्र असल्याने मंगळ रोहिणी योग निर्माण होणार आहे. शुभ योग याला जास्त उत्तम बनवत आहेत. शिवाय ५० वर्षानंतर ग्रहांचा विशेष योग सुद्धा बनत आहे.

अक्षय तृतीयेला ग्रहांची चाल
अक्षय तृतीयेला चंद्र आपल्या उच्च वृषभ राशीत राहिल. शुक्र आपल्या उच्च मीन राशीत राहिल. तसेच शनि आपल्या स्वतःच्या कुंभ राशीत आणि गुरू आपल्या स्वतःच्या मीन राशीत राहतील. अक्षय तृतीयेला बनलेल्या या शुभ योगात कोणतेही मंगल  कार्य करणं अत्यंत शुभ आणि फलदायी असेल.

अक्षय तृतीया म्हणजे काय?
अक्षय म्हणजे ‘कधीही न क्षय होणारे’ त्यामुळे या दिवशी केलेला जप, दान, ज्ञान हे अक्षय फलप्राप्ती देणारे असते. म्हणून याला अक्षय तृतीया असे म्हणतात. अनेक पुराणांमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळते. या दिवशी देवांचे व पितरांचे पूजन केले जाते. वैशाख महिना हा भगवान विष्णु साठी आवडता आहे. म्हणून विशेषतः विष्णू व देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते.

First Published on: April 20, 2022 4:49 PM
Exit mobile version