Kartik Purnima 2023 : कार्तिक पौर्णिमेला श्री विष्णूंसोबत करा देवी लक्ष्मीची पूजा

Kartik Purnima 2023 : कार्तिक पौर्णिमेला श्री विष्णूंसोबत करा देवी लक्ष्मीची पूजा

हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. या महिन्यात भगवान विष्णूंची विशेष पूजा-अर्चना केली जाते. श्री विष्णूंना कार्तिक महिना अतिशय प्रिय असल्याचं म्हटलं जातं. कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला श्री विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात, त्यानंतर कार्तिक पौर्णिमेला देखील त्यांच्या पूजन केले जाते. मात्र, कार्तिक पौर्णिमेचा हा दिवस फक्त श्री विष्णूंचा नव्हे तर भगवान शंकरांना देखील अधिक प्रिय आहे.

यंदा आज (27 नोव्हेंबर) रोजी कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले  जाते. कार्तिक पौर्णिमेची तिथी 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:53 पासून सुरू होणार असून 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:45 पर्यंत राहील.

कार्तिक पौर्णिमेला करा ‘हे’ काम

पौर्णिमेला दिप-दान का केले जाते?

 

या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे सर्व मनुष्य आणि देवी-देवता आनंदी झाले. सर्वांना त्रिपुरासुराच्या त्रासापासून मुक्ति मिळाली. त्यामुळे भगवान शंकरांना खूश करण्यासाठी या दिवशी सर्व देवी-देवतांनी काशीमध्ये जाऊन दीपोत्सव साजरा केला. तेव्हापासून त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो.

 


हेही वाचा :

कार्तिकी एकादशीला श्री विष्णूंसोबत का केले जाते उसाचे पूजन?

First Published on: November 27, 2023 11:45 AM
Exit mobile version