Chaitra Navratri 2023 : ‘या’ गोष्टी केल्याने देवीची होईल कृपा

Chaitra Navratri 2023 : ‘या’ गोष्टी केल्याने देवीची होईल कृपा

22 मार्च पासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्रीला विशेष महत्व आहे. भारताचं सनातनी नववर्ष 2080 ची सुरुवात सुद्धा याच दिवसापासून होत आहे . नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची उपासना केली जाते.या नवरात्रीदरम्यान भक्त काही नियमांचे पालन देखील करतात. परंतु त्यामध्ये महत्वाचं म्हणजे अशा खास महत्वाच्या पाच गोष्टी आहेत ज्या केल्याने देवीची असीम कृपा तुमच्यावर होते. चला तर मग जाणून घेऊया नवरात्र सुरु होण्यापूर्वी नक्की कोणती काम आपण पूर्ण करायला हवी.

नवरात्रीचे शुभ पर्व येण्या अगोदर संपूर्ण कराची साफसफाई करणार अत्यंत गरजेचे आहे. देवीचा आगमन आपल्या घरी होण्यापूर्वी घरात हे सर्व जाळी जळमटे स्वच्छ करणे गरजेचे आहे असं मानलं जातं की ज्या घरात साफसफाई न करता देवीची स्थापना केली जाते त्या घरावर देवीची कृपा होत नाही. घराची साफसफाई केल्यानंतर संपूर्ण घरामध्ये गंगाजल देखील शिंपडाव.

दरवाज्यावर स्वस्तिक काढा. आपल्या धर्मामध्ये स्वस्तिकाला विशेष महत्त्व दिले गेले.असं मानलं जातं की ज्या घरावर स्वस्तिक असतं त्या घरात माता लक्ष्मीची कृपा सदैव असते आणि म्हणूनच देवीच्या आगमनापूर्वी घरावर स्वस्तिक जरूर काढाव. त्याचप्रमाणे आपल्या घरातील देवघरात ज्या ठिकाणी देवीची स्थापना करण्यात येईल त्या ठिकाणी देखील स्वस्त नक्की काढाव.

व्रताची सामग्री घराची संपूर्ण साफसफाई झाल्यानंतर व्रताची सामग्री घरात घेऊन यावी. या सामग्रीमध्ये शेंगदाण्याच पीठ, साबुदाणा, सैंधव मीठ, फळ, बटाटे ,शेंगदाणे इत्यादी गोष्टी आणाव्यात.

नवरात्रीची साफसफाई झाल्यानंतर घरामध्ये अंडी, मास,मच्छी या गोष्टी आणू नयेत त्याचप्रमाणे लसूण , कांदा या तामसिक गोष्टींपासून देखील दूर राहावं घराच्या बाहेर सुद्धा खाताना या गोष्टींकडे लक्ष द्याव. दारू सारख्या नशा करणाऱ्या गोष्टी घरात आणू नये किंवा त्यांचा सेवन देखील करू नये .

कपड्यांची तयारी नवरात्रीमध्ये रंगाने विशेष महत्त्व असतं असं म्हटलं जातं की नवरात्रीमध्ये काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. आपल्या धर्मामध्ये काळ्या रंगाला अशुभ मानले गेले आणि म्हणून या दिवसात पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालावेत.


हेही वाचा :

Chaitra Navratri 2023 : नवरात्रीत देवीच्या ‘या’ प्रभावशाली मंत्राचा करा जप

First Published on: March 21, 2023 5:06 PM
Exit mobile version