Shardiya Navratri 2023 : यंदा हत्तीवर स्वार होऊन येणार देवी दुर्गा; जाणून घ्या महत्त्व

Shardiya Navratri 2023 : यंदा हत्तीवर स्वार होऊन येणार देवी दुर्गा; जाणून घ्या महत्त्व

हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पितृ पक्ष संपला की अश्विन महिन्याची सुरूवात होते. अश्विन महिन्याच्या सुरूवातीलाच अश्विन नवरात्र सुरू होते. हिंदू धर्मात अश्विन नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते.

दरम्यान, आता लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. ही नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.

शास्त्रानुसार या दिवशी मातेची पूजा, व्रत, उपासना इ. देवीची खरी भक्ती व भक्तीभावाने पूजा केल्यास अंबेच्या कृपेने भक्तांची सर्व दुःखे दूर होतात. ज्योतिष शास्त्रानुसार यावेळी शारदीय नवरात्र खूप शुभ मानली जात आहे. कारण यावेळी देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येणार आहेत. दरवर्षी देवी कोणत्या ना कोणत्या वाहनावर स्वार होऊन येतात. ज्यामध्ये शुभ आणि अशुभ चिन्हे असतात.

यंदा देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येणार

ज्योतिष शास्त्रानुसार, यावेळी शारदीय नवरात्रीला विशेष मानले जात आहे कारण यावेळी देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहेत. या वेळी रविवारपासून नवरात्री सुरू होत आहे. असे मानले जाते की, नवरात्रीच्या प्रारंभी रविवार आणि सोमवारी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येतात.

देवी हत्तीवर स्वार होऊन येणार म्हणजे नेमकं काय?

धार्मिक मान्यतेनुसार, हत्तीवर स्वार होऊन दुर्गा मातेचे आगमन शुभ मानले जाते. असे म्हणतात की, जेव्हा देवी हत्तीवर स्वार होऊन येतात, त्यावेळी त्यांच्यासोबत खूप आनंद आणि समृद्धी सुद्धा येते. हत्ती हे शहाणपण आणि समृद्धीचे प्रतीक आहे. ज्योतिष शास्त्रानुसार यामुळे पुढच्या नवरात्रीपर्यंतचे पुर्ण एक देशात आर्थिक समृद्धी आणि ज्ञानाचा विकास होईल.

देवीच्या प्रत्येक वाहनाचे महत्त्व

नवरात्रीसाठी देवी दुर्गा घोडा, म्हैस, डोली, माणूस, नाव(होडी) आणि हत्ती यांपैकी एका वाहनावर बसून येतात. यामध्ये देवी दुर्गा (होडी) आणि हत्तीवर आगमन होणं हे शुभ लक्षण मानलं जातं. बाकी सर्व अशुभ चिन्हे देतात.


Shardiya Navratri 2023 : घटस्थापनेआधी घरातून बाहेर काढा ‘या’ गोष्टी

First Published on: October 12, 2023 10:57 AM
Exit mobile version