घरासाठी काही वास्तु टीप्स

प्रत्येक वास्तुची काही तत्वे असतात. या तत्वांमध्ये जेव्हा फेरफार होते किंवा केली जाते तेव्हा त्या वास्तूचे संतुलन बिघडते. घरात नकारात्मक उर्जा वाढीस लागते. नोकरी, पैसा, आरोग्य, मुलांचे शिक्षण, नातेसंबंध या सगळ्यांवर या नकारात्मकतेचा परिणाम होतो. यामुळे वास्तुची काळजी घेणे आवश्यक असते. त्यासाठी या काही टीप्स.

मीठ- मीठाला वास्तूशास्त्रात विशेष महत्व आहे. नकारात्मक उर्जा घालवण्याचे काम मीठ करते. घरात सर्वाधिक नकारात्मक उर्जा असणारे ठिकाण हे शौचालय असते. यामुळे शौचालयात एका काचेच्या बाऊलमध्ये जाड मीठ ठेवावे. सात दिवसांनी पाण्यात फेकावे. दुसरे मीठ घ्यावे. कुटुंबातील सदस्य सतत आजारी किंवा उदास राहत असेल तर मीठ आणि काळ्या मोहरीने त्याची नजर काढावी. परिणाम लगेच दिसून येतो.

धूप-दररोज घरात धूप जाळून त्यावर हवन साहित्य, कापूर आणि तूप टाकून, देवाचे मंत्र जपा. त्याचा धूर घराच्या प्रत्येक भागात जाऊ द्या, कारण यामुळे घराची नकारात्मकता नष्ट होईल.

घरात पसारा नसावा-लक्ष्मीचा वास हा स्वच्छ ठिकाणी असतो. यामुळे घर लहान असले तरी ते टापटीप ठेवावे. घरभर पसारा करु नये. वेळच्या वेळी आवरून ठेवावा. जुन्या मोडकळीस आलेल्या वस्तू, फर्निचर, भांडी तातडीने काढून टाकावीत. या पसाऱ्यामुळे सकारात्मक उर्जेच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो.

दिशा-वास्तुशास्त्रात दिशांना फार महत्व असते. यामुळे घरातील सदस्यांच्या जन्मतारखेप्रमाणे त्यात त्या दिशेला वस्तू ठेवाव्यात.

चपला,बूट- बरेचजण बाहेरून थेट घऱात चपला बूट घालून येतात. घरातच मुख्य दाराजवळा चपला, बूट काढून ठेवतात. जे वास्तुसाठी अयोग्य आहे. चपला, बूटांबरोबर घऱात नकारात्मक उर्जाही प्रवेश करते. यामुळे बाहेरून आल्यावर पादत्राणे बाहेरच काढावेत.

भिंतीवरील चित्रे- घरात महाभारत यु्द्धाचे फोटो किंवा चित्र ठेवू नयेत. यामुळे घरात सतत वाद होतात. त्याजागी पक्ष्यांची जोडी. वाहणारे पाणी अशी चित्रे ठेवावीत.

 

First Published on: November 30, 2021 8:01 PM
Exit mobile version