Vinayak Chaturthi 2022 : विनायक चतुर्थी 3 जूनला, ‘या’ उपायांनी होईल सर्व मनोकामनांची पूर्ती

Vinayak Chaturthi 2022 : विनायक चतुर्थी 3 जूनला, ‘या’ उपायांनी होईल सर्व मनोकामनांची पूर्ती

ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते. या वर्षी 3 जून, शुक्रवारी विनायक चतुर्थी असणार आहे. विनायक चतुर्थी 2 जून, गुरूवारी रात्री 12 वाजून 17 मिनीटांनी चालू होणार असून 3 जून शुक्रवारी, रात्री 2 वाजून 41 मिनीटांनी असणार आहे. विनायक चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 10:56 पासून ते दुपार 1:43 पर्यंत असणार आहे. यावेळीची विनायक चतुर्थी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम मानण्यात आली आहे.

या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग सकाळी 5:23 पासून ते संध्याकाळी 7 पर्यंत असणार आहे. विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला काही उपाय करून श्रीगणेशांची कृपा, सफलता, सुख , सौभाग्य , धन यांची प्राप्ती होऊ शकते.

विनायक चतुर्थीला करा ‘हे’ उपाय

 

1. विनायक चतुर्थीच्या दिवशी शुभ मूहूर्तावर श्रीगणेशांची पूजा करताना श्रीगणेशांच्या कपाळावर अष्टगंधाचा टिळा लावा. त्यावेळा हा मंत्र म्हणा, सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्। शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्॥ या उपायाने श्रीगणेश तुमच्यावर प्रसन्न होतील.

2. विनायक चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशांना झेंडू किंवा जास्वंदीच्या फुलांची माळ घाला. त्यानंतर संपूर्ण पूजा संपल्यानंतर ती माळ घराच्या मुख्य दारावर लावा, हा उपाय केल्याने घरातील गृह क्लेश दूर होतील, शिवाय तुमची मनोकामना सुद्धा पूर्ण होईल.

3. वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशांना हिरवे वस्त्र अर्पण करा. यासोबतच 5 लवंग, 5 वेलची श्रीगणेशांना अर्पित करा. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल.

4. घरामध्ये सुख, समृद्धी, धन यांमध्ये वाढ व्हावी यासाठी विनायक चतर्थीच्या दिवशी श्रीगणेशांना 21 दूर्वा अर्पित करा.

5. श्रीगणेशांना मोदक खूप प्रिय असतात त्यामुळे श्रीगणेशांना 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण करा.

6. विनायक चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा.

 


हेही वाचा :http://Chanakya Niti : चाणक्यांच्या मते, अशा कुटुंबामध्ये कधीही जाणवत नाही पैशांच्या कमतरता

First Published on: June 2, 2022 4:54 PM
Exit mobile version