भाऊबीज का साजरी केली जाते? काय आहे यमराज आणि यमुनेची कथा

भाऊबीज का साजरी केली जाते? काय आहे यमराज आणि यमुनेची कथा

हिंदू पंचांगानुसार, प्तत्येक वर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला भाऊबीज सण साजरा केला जातो. या वर्षी भाऊबीज बुधवार, 26 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा सण भावा-बहिणीच्या अतूट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. ज्यादिवशी बहिण आपल्या भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावते आणि आरती ओवाळते. तसेच त्याचा दिर्घायुष्याची प्रार्थना करते. दिवाळीनंतर भाऊबीजचा सण मोठ्या उत्साहात साजारा केला जातो. मात्र, भाऊबीज साजरा करण्यामागे नेमकं काय कारण आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? खरंतर, पौराणिक कथेनुसार भाऊबीजची कथा यमराज आणि त्यांची बहिण यमुनेशी संबंधित आहे.

भाऊबीजची प्रचलित कथा

भगवान सूर्याची पत्नी छाया यांनी यमराज आणि यमुना यांना लग्न दिला. यमुनेचे आपल्या भावावर खूप प्रेम होते. यमुना नेहमी यमराजला तिच्या घरी जेवण करण्यासाठी बोलवायची. परंतु यमराज आपल्या कामामध्ये व्यग्र असल्यामुळे यमुनाच्या घरी जात नसत. एके दिवशी कार्तिक शुक्ल द्वितीयेला यमुना पुन्हा यमराजाला घरी बोलावते.

यमराज म्हणाला मी तर सर्वांचे प्राण घेतो. म्हणूनच मला कोणी माझ्या घरी बोलवत नाही. परंतु माझी बहिण यमुना मला एवढ्या प्रेमाने बोलवत आहे. त्यामुळे तिला खूश करणं माझं कर्तव्य आहे. म्हणून ते यमुनेच्या घरी जातात. यमराजला पाहून यमुना खूप खूश होते. तिने यादिवशी यमराजसाठी पंचपक्वान्न तयार केले. त्यांचा आदर सत्कार केला. त्याला पंचारतिने ओवाळलं. तसेच प्रत्येक वर्षी याचं दिवशी घरी येण्याचे वचन यमराज कडून घेतले.

यमुनेने सांगितलं की, माझ्या प्रमाणे जी बहिण या दिवशी आपल्या भावाचा आदर सत्कार करेल. तिच्या भावाला दीर्घायुष्य लाभेल. त्यावेळी भावाने तिला ‘तथास्तु’ म्हणून आर्शिवाद दिला. तेव्हापासून हिंदू धर्मात भाऊबीज हा सण साजरा केला जातो.


हेही वाचा :

दिवाळीच्या पहाटे लवकर उठून करा ‘हे’ काम, हमखास होईल धनलाभ

First Published on: October 20, 2022 11:21 AM
Exit mobile version