कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: उखाडे कुटुंबाकडून कोरोना योद्धांना सलाम!

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: उखाडे कुटुंबाकडून कोरोना योद्धांना सलाम!

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: उखाडे कुटुंबाकडून कोरोना योद्धांना सलाम!

यंदा गणेशोत्सवावर कोरोनाच सावट आल्यामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंनी गणपती बाप्पाचा देखावा तयार केला जात आहे. अशाच प्रकारे नाशिक जिल्ह्यातील म्हसरूळ येथील तेजस प्रकाश उखाडे आणि तेजश्री प्रकारे उखाडे या दोघांनी मिळून कोरोना संदर्भात जनजागृती आणि वृक्षसंवर्धन या दोन्ही विषयांवर देखावा सादर करण्यात केला आहे. विशेषत: सादर करण्यात आलेल्या देखाव्यातून प्रामुख्याने सर्वांनी कोरोना आजारापासून काळजी घेण्यासंदर्भात संदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा आणि मनपा तसेच पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नर्से, आरोग्य अधिकारी-कर्मचारी, मीडिया यांसारख्या कोविड योध्दांना मानाचा सलाम देखाव्यातून केला आहे. सॅनिटायझरने कोरोना विषाणूला मारा, साबणाने धुवा स्वच्छ हात अन् कोरोना विषाणूला ठेवा लांब. माझा जीव घेऊ नका वृक्षरोपण करा, अशा प्रकारची घोषवाक्य फलकावर लिहून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


हेही वाचा – कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: देखाव्यातून सादर केले योद्धांचे काही


 

First Published on: August 30, 2020 5:27 PM
Exit mobile version