घरकोरोना विघ्नहर्ता स्पर्धाकोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: देखाव्यातून सादर केले योद्धांचे काही क्षण

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: देखाव्यातून सादर केले योद्धांचे काही क्षण

Subscribe

घाटकोपर पूर्व येथील अंकुश रामकृष्ण माईन गेले ७५ वर्ष गणेशोत्सव सोहळा साजरा करत आहे. माईन यांच्या गणेशोत्सव सोहळा १० दिवसांचा असतो. माईन यांच्या कुटुंबातील बाप्पाच्या हाती यावर्षी कॅमेरा दिसत आहे. म्हणजेच गणपती बाप्पा फोटोग्राफर झाल्याचे दाखवले आहे. दरम्यान कोरोनाच्या संकटात लोकांना मदतीचा हातभार देण्यासाठी आणि माणुसकी जपणाऱ्या देव माणसांचे काही क्षण बाप्पाने टिपले आहेत. आणि बाप्पाने आपल्या भक्तांना त्यातून संदेश दिला आहे की, डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार, नर्स, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, समाज सेवक यांच्या रूपाने मी तुमच्या सोबत आहे या सर्वांना सहकार्य करा आणि आपण लवकरच कोरोनावर मात करू, असा माईन यांच्या गणपती बाप्पाच्या देखाव्याचा विषय आहे. या देखाव्यात कोरोना संदर्भात संदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

सरकारने लावलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोलच्या बंदी मुळे आणि बाप्पाच्या मुर्तींचे विसर्जन नीट होत नसल्याने मागील ३ वर्ष प्रदूषण मुक्त गणेशोत्सव माईन कुटुंबीय साजरा करत आहे..

- Advertisement -

सजावट करण्यासाठी वापरलेले साहित्य –

जुना बॉक्स, कार्ड पेपर, कलर, फोटो, हँडमेड पेपर


हेही वाचा – कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: प्राणीमात्रांनाही जवळचा वाटणारा बाप्पा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -