राशीभविष्य : शनिवार,०३ एप्रिल २०२१

राशीभविष्य : शनिवार,०३ एप्रिल २०२१

राशीभविष्य

मेष ः- क्षुल्लक कारणाने तुमचे मन उदास, दुःखी होऊ शकते. खाण्याची काळजी घ्या. वस्तू सांभाळा.

वृषभ ः- मनाची एकाग्रता वाढेल. ठरविलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वासाने चर्चा करता येईल.

मिथुन ः- धंद्यात जम बसेल. मागील येणे वसूल करा. कला क्षेत्रात झालेली ओळख फायदेशीर ठरेल.

कर्क ः- वरिष्ठांना न दुखावता तुमचे मत त्यांना सांगा. कायद्याचे पालन करा. गोड बोलून धंदा मिळवा.

सिंह ः- दौर्‍यात ताणतणाव होऊ शकतो. खाण्याचे हाल होतील. प्रवासात नवीन ओळख होईल; पण सावध रहा.

कन्या ः- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. घरातील लोकांना खूश करण्यासाठी प्रयत्न कराल. गोड खाण्यास मिळेल.

तूळ ः- ईश्वरी चिंतनात मनाची एकाग्रता होईल. मन खूश करणारी बातमी मिळेल. सन्मान मिळेल.

वृश्चिक ः- मनावरील ताण हलका होईल. मौज-मजा कराल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. नवीन ओळख होईल.

धनु ः- रागावर ताबा ठेवा. तुमच्यावर आरोप होण्याची शक्यता आहे. जुन्या आठवणीने मन भरून येईल.

मकर ः- कुटुंबात आनंदी रहाल. चांगली बातमी मिळेल. धंदा वाढेल. महत्त्वाचे काम आजच करून घ्या.

कुंभ ः- तुमच्या विचारांना जास्त प्रतिसाद मिळण्यास वेळ लागेल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. वाहन जपून चालवा.

मीन ः- महत्त्वाची भेट आजच घ्या. चर्चा यशस्वी होईल. कला-साहित्यात चांगले यश मिळेल. आनंदी रहाल.

First Published on: April 3, 2021 1:33 AM
Exit mobile version