राशीभविष्य : गुरुवार २५ एप्रिल २०२४

राशीभविष्य : गुरुवार २५ एप्रिल २०२४

राशीभविष्य

मेष – मनावरील दडपण कमी होईल. संतती व जीवनसाथीच्या मदतीने घरातील समस्या कमी होईल. धंद्यात चांगली बातमी मिळेल.
वृषभ – स्वतःच्या स्वार्थासाठी घरातील व्यक्तींना त्रास दिल्यास समस्या वाढतील. प्रवासात सावध राहा. कायद्याला तुच्छ समजू नका.
मिथुन – कामातील चिंता कमी होईल. धंद्यात लक्ष द्यावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल. वाद व तणाव निवळेल.
कर्क – पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे लागेल. धंद्यातील थकबाकी वसूल करा. प्रयत्नाने किचकट कामात यश मिळवता येईल.
सिंह – आपुलकीच्या भावनेने बोलल्यास घरातील तणाव व वाद मिटवता येईल. वाटाघाटीबद्दल जास्त अपेक्षा ठेवू नका.
कन्या – धंद्यात जम बसेल. प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात संधी शोधता येईल. गोड बोलून तुमचे ध्येय गाठता येईल.
तूळ – मनाची द्विधा अवस्था होईल. अतिविचार केल्यास कामाची वेळ पुढे निघून जाईल. महत्त्वाचा फोन येईल. मान-सन्मान मिळेल.
वृश्चिक – कामात एकाग्रता ठेवल्यास काम चांगले होईल. सामाजिक कार्यात यश मिळेल. धंद्यात वाढ होईल.
धनु – उत्साहवर्धक वातावरण राहील. स्पर्धा जिंकता येईल. वरिष्ठ खूश होतील. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील.
मकर – ठरविलेल्या वेळेनुसार काम पूर्ण करू शकाल. नवीन परिचय होईल. खरेदी करण्यास जाता येईल. प्रतिष्ठा मिळेल.
कुंभ – घरातील माणसांचा गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. स्पर्धा जिंकण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल.
मीन – धंद्यात फायदा होईल. प्रवासात घाई नको. कायद्याचे पालन करा. क्षुल्लक वाद वाढवू नका. प्रकृतीची काळजी घ्या.

First Published on: April 25, 2024 1:56 AM
Exit mobile version