मेष : लोकांचा एकत्र करण्याचा तुमचा विचार प्रभावी ठरेल. सर्व सोपे आहे असे समजू नका. प्रयत्न करा.
वृषभ : कोर्टाच्या कामास यश मिळेल. दर्जेदार लोकांची ओळख होईल. स्पर्धेत प्रगती होईल.
मिथुन : विचारांना चालना मिळेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. वसुली होईल.
कर्क : रागाच्या भरात कुणालाही अपशब्द बोलू नका. मदत मिळणे कठीण आहे.
सिंह : घरातील समस्या सोडवता येईल. स्पर्धेत जिंकाल. वाटाघाटीत फायदा होईल.
कन्या : विरोध मोडून काढणे सोपे नाही. प्रयत्न मात्र करा. तुमचे मुद्दे पटवून द्या.
तूळ : तुमच्या कार्याला दिशा मिळेल. प्रसिद्धी मिळेल. धंद्यात प्रगती होईल. वेगाने कामे करून घ्या.
वृश्चिक : शुल्लक कारणाला जास्त महत्त्व देऊ नका. तडजोड करावी लागेल. वाहन जपून चालवा.
धनु : प्रवासात घाई करू नका. तुमची कामे होतील. रागाने बोलू नका. नवीन ओळख होईल.
मकर : लोकांचा पाहिजे तसा पाठिंबा मिळणे कठीण आहे. प्रतिष्ठा सांभाळा. वाद जास्त करू नका. धंदा वाढवा.
कुंभ : विचारांना दिशा मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. मुलांची प्रगती होईल. दूरच्या प्रवासाचे ठरवाल.
मीन : घरात गैरसमज होईल, वाद होईल. कामाकडे लक्ष द्या. नोकरीच्या ठिकाणी सावध राहा.