राशीभविष्य गुरुवार, १४ मे २०२०

राशीभविष्य गुरुवार, १४ मे २०२०

मेष ःनको असलेल्या व्यक्तीची भेट होईल. त्यांच्यासाठी वेळ, पैसा, खर्च करावा लागेल.

वृषभ ःआजचे काम उद्यावर टाकू नका. कोर्टाच्या कामात मदत मिळेल. जुना मित्र भेटेल.

मिथुन ःधंद्यात गिर्‍हाईकाबरोबर गोड बोला, वाद घालू नका. अरेरावीची भाषा करू नका.

कर्क ःमहत्त्वाचा फोन आल्याने उत्साह वाढेल. सामाजिक कार्यात यश मिळेल. योग्य सल्ला घेता येईल.

सिंह ःमोठी खरेदी करण्याचे ठरवाल. धंदा वाढवा. थकबाकी मिळेल. मुलांची प्रगती होईल.

कन्या ःअडचणीत आलेले काम करण्याचा प्रयत्न करा. कायद्याच्या बाबतीत यश मिळेल. खर्च कराल.

तूळ ःकंटाळा येईल. कामाचा व्याप वाढेल. धंद्यात आळस करू नका. वरिष्ठ मोठे काम देतील.

वृश्चिक ःसरकार दरबारची कामे करून घ्या. धंद्यासाठी मालाची खरेदी आजच करा. व्यवहारात सावध रहा.

धनु ःथकबाकी वसूल करा. कलाक्रीडा क्षेत्रात जास्त मेहनत घ्यावी लागेल. धंद्यात फायदा होईल.

मकर ःनोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल. दौरा करावा लागेल. घरापासून दूर जाण्याची वेळ येईल.

कुंभ ःकिरकोळ कारणाने वादविवाद शेजार्‍याबरोबर होऊ शकतो. धावपळ, दगदग होईल.

मीन ःआजचे काम उद्यावर टाकू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल तरी पैसाही मिळेल. पदाधिकार मिळेल.

First Published on: May 14, 2020 1:12 AM
Exit mobile version