धनत्रयोदशीला असणार शुभ संयोग; ‘या’ 5 राशींची होणार चांदी

धनत्रयोदशीला असणार शुभ संयोग; ‘या’ 5 राशींची होणार चांदी

अश्विन महिन्याच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर, धन्वंतरी यांची या दिवशी पूजा केली जाते. यंदा 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी असणार आहे. या शुभ दिवशी काही दुर्लभ संयोग देखील बनणार आहे. ज्याचा प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

धनत्रयोदशी ‘या’ राशींसाठी शुभ

 

धनत्रयोदशी वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक लाभ करणारी ठरेल. या व्यक्तींना उत्पनाची विविध मार्ग उपलब्ध होतील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. कुटुंबावर देवी लक्ष्मीचा आर्शिवाद असेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशिर्वाद असेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना धनत्रयोदशीच्या काळात नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल. व्यवसायात यश मिळेल. दूरचे प्रवास घडू शकतात.

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी धनत्रयोदशीचा काळ आर्थिक तंगी दूर करणारा असेल. या काळात अचानक धनलाभ होईल. साहस आणि पराक्रम वाढेल. कामात पद-प्रतिष्ठा मिळेल.

धनत्रयोदशीला ग्रहांची शुभ संयोग मकर राशीच्या लोकांना अपार संपत्ती आणि समृद्धी देईल. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात सुख-समृद्धी वाढेल. पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.


हेही वाचा :

Diwali 2023 : धनत्रयोदशीला खरेदी करा ‘या’ वस्तू

First Published on: November 3, 2023 4:17 PM
Exit mobile version