Saturday, April 27, 2024
घरमानिनीReligiousDiwali 2023 : धनत्रयोदशीला खरेदी करा 'या' वस्तू

Diwali 2023 : धनत्रयोदशीला खरेदी करा ‘या’ वस्तू

Subscribe

दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते. अश्विन महिन्याच्या त्रयोदशी दिवशी हा सण साजरा केला जातो. देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर, धन्वंतरी यांची या दिवशी पूजा केली जाते. असं म्हणतात की, या दिवशी धनाची पूजा करणं शुभ मानलं जातं. तसेच या दिवशी काही विशिष्ट गोष्टी खरेदी करण्याचे देखील महत्व आहे. धनतेरसच्या दिवशी केली जाणारी खरेदी तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी घेऊन येते. त्यामुळे या दिवशी नक्की कोणत्या वस्तू खरेदी केल्याने लाभ होईल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

धनत्रयोदशीला खरेदी करा ‘या’ वस्तू

झाडू

- Advertisement -


असं म्हणतात की, धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणं शुभ असते. देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते आणि झाडू घर स्वच्छ करायचे काम करते. त्यामुळे या दिवशी झाडू खरेदी करा.

धणे

- Advertisement -


या दिवशी धणे खरेदी करुन त्याचा नैवेद्य दाखवणं देखील शुभ मानलं जातं. या दिवशी धण्यांची पूजा करुन ते तिजोरीमध्ये ठेवल्यास घरामध्ये आर्थिक चनचन भासत नाही.

गोमती चक्र


धनत्रयोदशीच्या दिवशी गोमची चक्र खरेदी करण्याचे खास महत्व आहे. या दिवशी तुम्ही 11 गोमती चक्र खरेदी करुन त्याची पूजा करा आणि ते पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा.

धातू


या दिवशी तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे कोणताही धातू खरेदी करा. यामध्ये तुम्ही सोने, चांदी, तांबे, पितळ किंवा स्टीलची वस्तू देखील खरेदी करु शकता. तसेच त्यांची घरी आणल्यावर पूजा देखील करा.

श्रीयंत्र


श्रीयंत्र देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे धनत्रयोदशीला ते आवर्जून खरेदी करावे आणि त्याची पूजा करावी.

 


हेही वाचा :

Diwali 2023 : ‘या’ दिवशी आहे धनतेरस, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज

- Advertisment -

Manini