राशीभविष्य : गुरुवार, २५ फेब्रुवारी २०२१

राशीभविष्य : गुरुवार, २५ फेब्रुवारी २०२१

राशीभविष्य

मेष : रेंगाळलेली कामे वेगाने पूर्ण करता येतील. तुमचा प्रभाव तुमच्या क्षेत्रात वाढेल. धंद्यात वाढ होईल. मैत्री होईल.

वृषभ : रागावर नियंत्रण ठेवा. वाहनापासून त्रास होईल. खर्च करावा लागेल. यांत्रिक बिघाड होऊ शकतो. अनोळखी व्यक्तीपासून त्रास.

मिथुन : महत्त्वाच्या व्यक्तीची भेट घेता येईल. धंद्यात नवे काम मिळेल. नोकरी मिळेल. प्रेमाला चालना मिळेल.

कर्क : मानसिक तणाव वाटेल. प्रयत्नाने तुम्हाला प्रश्न सोडवता येईल. उत्साहवर्धक भेट घडून येईल. स्पर्धेत पुढे जाल.

सिंह : वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. स्पर्धा जिंकाल. तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न होईल.

कन्या : पोटाची काळजी घ्या. जवळच्या व्यक्तीसाठी धावपळ करावी लागेल. नोकरीत कामात चूक होऊ शकते.

तूळ : नवीन ओळख होईल. दूरच्या प्रवासाचा आनंद घ्याल. धंद्यात वाढ होईल. जुने येणे वसूल करा, केस जिंकाल.

वृश्चिक : मौल्यवान वस्तू सांभाळा. तुमच्या कृत्याला लोक विरोध करतील. पोटाची काळजी घ्या. धंद्यात लक्ष द्या.

धनु : आपुलकीच्या व्यक्तीची भेट घडेल. धंद्यात सुधारणा करता येईल. नोकरी मिळेल. उत्साह वाढेल.

मकर : जुने लोक तुमच्याकडे मदतीची अपेक्षा ठेवतील. मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल.

कुंभ : महत्त्वाचे काम करून घ्या. तुम्ही ठरविलेल्या योजना मार्गी लावता येतील. धंद्यात वाढ होईल.

मीन : धंद्यातील वाद समोपचाराने मिटवता येईल. नवीन ओळख वाढेल. आरोपाला उत्तर द्याल.

First Published on: February 25, 2021 1:00 AM
Exit mobile version