Raksha Bandhan 2023 : भावाच्या राशीनुसार निवडा राखी

Raksha Bandhan 2023 : भावाच्या राशीनुसार निवडा राखी

रक्षाबंधनचा दिवस प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी खूप विशेष असतो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी पंचक आणि भद्रा निर्माण होत आहे. त्यामुळे रक्षाबंधन हा सण 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी साजरा केला जाईल. त्यादिवशी भावाला राखी बांधणे शुभ माणले जाते. मात्र, राशीनुसार भावाच्या आयुष्यात सुख-समृद्धी येते तसेच यामुळे भाऊ-बहिणीचे नाते अधिक घट्ट होते.

राशीनुसार भावाला बांधा राखी

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. तुमच्या भावाची रास जर मेष असेल तर त्याला लाल रंगाची राखी बांधा. यामुळे भावाला त्याच्या आयुष्यात यश मिळेल.

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. तुमच्या भावाची रास वृषभ असल्यास त्याला तुम्हा गुलाबी किंवा लाल रंगाची राखी बांधा. लाल रंगाची राखी तुमच्या भावाला नक्कीच लाभदायक ठरेल.

मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. मिथुन राशीला हिरवा रंग फायदेशीर ठरतो. हा रंग भावाच्या जीवनात सुख, समृद्धी आणण्यास ती लाभदायक ठरू शकेल.

कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. तुमच्या भावाची रास कर्क असेल, तर त्याला पांढऱ्या रंगाची राखी बांधवी.

सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. तुमच्या भावाची रास सिंह असेल, तर त्याला केशरी किंवा सोनेरी रंगाची राखी बांधावी. भाऊरायाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी ती उपयुक्त ठरेल.

कन्या राशीचा स्वामी बुध आहे. तुमच्या भावाची रास कन्या असेल, तर त्याला हिरव्या रंगाची राखी बांधावी. भावाच्या जीवनात सुख, समृद्धी आणण्यास ती लाभदायक ठरू शकेल.

तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. तुमच्या भावाची रास तुळ असेल, तर त्याला राखाडी, गुलाबी किंवा सफेद रंगाची राखी बांधावी. भाऊरायाच्या जीवनात शुभ परिणाम आणण्यासाठी ती उपयुक्त ठरेल.

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. तुमच्या भावाची रास वृश्चिक असेल, तर त्याला लाल रंगाची राखी बांधावी.

धनु राशीचा स्वामी गुरू आहे. तुमच्या भावाची रास धनु असेल, तर त्याला केशरी व पिवळ्या रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी. भावाच्या जीवनात सुख आणि शांतता आणण्यास ती उपयुक्त ठरेल.

मकर राशीचा स्वामी शनी आहे. तुमच्या भावाची रास मकर असेल, तर त्याला गडद निळा रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी. यामुळे भाऊ आणि बहिणीचे नाते अधिक दृढ होईल, असे सांगितले जाते.

कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. तुमच्या भावाची रास जर कुंभ असल्यास त्याला निळ्या शेडमधील किंवा राखाडी रंगाची राखी बांधा.

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. तुमच्या भावाची रास मीन असेल, तर त्याला केशरी व पिवळ्या रंगाचा समावेश असलेली राखी बांधावी. भावाच्या जीवनात सुख आणि शांतता आणण्यास ती उपयुक्त ठरेल.


हेही वाचा : Raksha Bandhan 2023 : राखी बांधताना ‘हा’ मंत्र म्हटल्याने; भावाला लाभेल दीर्घायुष्य

First Published on: August 25, 2023 7:02 PM
Exit mobile version