KXIP vs KKR: पंजाबचा सलग पाचव्यांदा विजय; गुणतालिकेत चौथ्या स्थानावर

KXIP vs KKR: पंजाबचा सलग पाचव्यांदा विजय; गुणतालिकेत चौथ्या स्थानावर

किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सला ८ गडी राखून पराभूत करत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर विराजमान झाले आहेत. शुभमन गिल-मॉर्गन जोडीची महत्त्वाची भागीदारी आणि लॉकी फर्ग्युसनने शेवटच्या षटकांमध्ये केलेली फटकेबाजी यांच्या बळावर कोलकाताच्या संघाने २० षटकांत केवळ १४९ धावांपर्यंतच मजल मारत पंजाबला १५० धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाकडून मनदीप सिंग (६६*) आणि ख्रिस गेल (५१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर कोलकाताला पराभूत केलं. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा हा सलग पाचवा तर स्पर्धेतील सहावा विजय ठरला. पंजाबने या विजयाच्या जोरावर चौथ्या स्थानी विराजमान होत स्पर्धेतील आव्हान कायम राखले.

First Published on: October 26, 2020 11:28 PM
Exit mobile version