Karnataka Election 2023 : बजरंगदल वि. बजरंग बली… सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

Karnataka Election 2023 : बजरंगदल वि. बजरंग बली… सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर आता येथे सत्तांतर होऊन काँग्रेसच्या हाती राज्यकारभार जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत 173 निकाल हाती आले असून त्यात 103 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. तर, भाजपाने 50 तर, जनता दल (सेक्युलर)ने 16 जागांवर विजय मिळविला आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मिम्सचा अक्षरश: पाऊस पडत आहे.

राष्ट्रीय जनता दलाने (RJD) भाजपावर निशाणा साधत एक पोस्ट ट्वीट केली आहे. यामध्ये राजदने भाजपाला ‘बजरंग दल’ आणि काँग्रेस पक्षाला ‘बजरंगबली’ म्हटले आहे. अनेक नेते, कार्यकर्ते आणि नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून भाजपाला घेरण्यास सुरुवात केली आहे.

राजदचा भाजपावर निशाणा

बजरंगबली अन् बजरंग दल…

कर्नाटकातील भाजपच्या पराभवानंतर


कर्नाटकातील काँग्रेस विजयाबद्दल

काँग्रेसने भाजपाला धोबीपछाड दिला…

काँग्रेसला निर्विवाद बहुमत मिळणार हे निश्चित झाल्यावर

भाजपा मुख्यालयातील चित्र


गोदी मीडियाची स्थिती…

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 43.09 टक्के, भाजपाला 35.82 टक्के मते मिळाली आहेत. तर, जद (सेक्युलर)ला 13.30 टक्के मते मिळाली आहेत.

First Published on: May 13, 2023 5:32 PM
Exit mobile version