Karnataka Election Result 2023: ‘या’ 10 जागांकडे लक्ष, जाणून घ्या सविस्तर

Karnataka Election Result 2023: ‘या’ 10 जागांकडे लक्ष, जाणून घ्या सविस्तर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज, शनिवारी घोषित होईल. एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार सत्ताधारी भाजपची धाकधूक वाढली आहे. कारण, बहुतांश पोल्समध्ये भाजपचा पराभव, तर काँग्रेसच्या विजयाचं भाकित वर्तवण्यात आलं आहे. इंडिया टुडे- अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, काँग्रेसला सर्वाधिक 122 ते 140, तर भाजपला 62 ते 80 जागा मिळवण्याची शक्यता आहे. तसचं, जेडीएसला 20 ते 25, तर इतरांना 0 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 10 महत्त्वाच्या जागांवर सर्वाचं लक्ष लागलं आहे. मोठ्या व्यक्तींची प्रतिष्ठा या जागांवर पणाला लागली आहे. ( National news Karntaka vidhan sabha election prediction BJp challenges Explained )

शिगगाव– ही कर्नाटकातील सर्वात हायप्रोफाईल सीट आहे. याठिकाणहून मुख्यमंत्री बोम्मई रिंगणात आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने यासिर अहमद खान पठाण यांना तिकीट देण्यात आलं आहे. बोम्मई येथे 2008 पासून निवडून येत आहेत.

हुबळी-धारवाड मध्य- कर्नाटकचे दिग्गज लिंगायत नेते जगदीश शेट्टर भाजप सोडल्यानंतर काँग्रेसच्या तिकीटावर येथून लढत आहेत. ते येथून 6 वेळा आमदार आहेत. या मतदार संघात भाजपने महेश तेंगीनाकाई यांना तिकीट दिलं आहे.

कनकपुरा– या मतदारसंघात अद्याप भाजपचं खातं उघडलेलं नाही. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार कनकापुरा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने येथे मंत्री आर अशोक यांना त्यांच्या विरोधात उभे केले आहे.

चन्नापट्टन – JDS प्रमुख एचडी कुमारस्वामी स्वत: या जागेवरुन उमेदवार आहेत. कुमारस्वामी यांच्या विरोधात भाजपने सीपी योगेश्वर यांना तर काँग्रेसने गंगाधर एस यांना तिकीट दिलं आहे.

चित्तपूर– काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे येथून निवडणूक लढवत आहे. प्रियांकाच्या विरोधात भाजपच्या मणिकंता राठोड आहेत.

अथणी– माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे कर्नाटकातील अथणी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. लक्ष्मण सावदी यांनी नुकतेच भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजपने येथून महेश कुमथल्ली यांना उमेदवारी दिली आहे.

तसंच, वरुणा, होलेनरसीपूर, सिरसी, शिकारीपूर येथीलही जागांवर लक्ष लागलं आहे. या सर्व ठिकाणी भाजप निवडून येत आहे. त्यामुळे यावेळी काय निर्णय लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंचं, मागच्या दोन निवडणुकांमध्ये कोणी बाजी मारली होती ते पाहुया.

विधानसभा निवडणूक २०१८ चा निकाल

एकूण जागा – २२२, बहुमताचा आकडा – ११३
भारतीय जनता पक्ष – १०४
काँग्रेस – ७८
जनता दल (एस) – ३७
मुख्यमंत्री – येदियुरप्पा आणि बसवराज बोम्मई भाजप

विधानसभा निवडणूक २०१३ चा निकाल

एकूण जागा – २२४, बहुमताचा आकडा – ११३
काँग्रेस – १२२
भारतीय जनता पक्ष – ४०
जनता दल (एस) – ४०
मुख्यमंत्री – सिद्धरमैय्या, काँग्रेस

First Published on: May 13, 2023 12:30 AM
Exit mobile version