N95,तीन पदरी आणि कापडी मास्कपेक्षा अधिक प्रभावी असलेला 3D प्रिंटेड मास्क आहे तरी काय? जाणून घ्या

N95,तीन पदरी आणि कापडी मास्कपेक्षा अधिक प्रभावी असलेला 3D प्रिंटेड मास्क आहे तरी काय? जाणून घ्या

N95,तीन पदरी आणि कापडी मास्कपेक्षा अधिक प्रभावी असलेला 3D प्रिंटेड मास्क आहे तरी काय? जाणून घ्या

कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठीचे पहिले हत्यार म्हणजे मास्क वापरणे. कोरोनाचा जगभर प्रसार झाल्यापासून मास्क घालण्याचे आवाहन केले जात आहे. N-95 मास्क सर्वात सुरक्षित मास्क म्हणून ओळखण्यात येतो. मात्र एन -95 मास्क तितकाच महाग ही आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडतील असे तीन पदरी आणि कापडी मास्क बाजारात उपलब्ध झाले. तीन पदरी आणि कापडी मास्कमुळेही कोरोनापासून बचाव होऊ शकतो यावर अनेकांनी अभ्यासही केला आहे. मात्र N -95, तीन पदरी आणि कापडी मास्कपेक्षा अधिक प्रभावी असलेला थ्रीडी-प्रिंटेड मास्क (3D printed mask) अधिक प्रभावी असल्याचा दावा पुणे येथील थिंकर टेक्नोलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (hinker Technology India Pvt pune) या स्टार्ट अप कंपनीने केला आहे. एन -95, तीन पदरी आणि कापडी मास्कपेक्षा अधिक प्रभावी असलेला थ्रीडी-प्रिंटेड मास्क आहे तरी काय? जाणून घ्या (3D printed mask is more effective than N95 mask three-layer and cloth mask )

थ्रीडी प्रिंटींग आणि फार्मास्युटिकल्सच्या एकत्राकरणातून या मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. हा मास्क कोरोना विषाणूचे कण संपर्कात आल्यास त्यावर हल्ला करतो. या मास्कवर बाहेरुन विरुसाईड्स या विषाणूरोधक घटकांचे कोटींग असल्याचे थिंकर टेक्नोलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सांगितले आहे. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स आणि विविध औषधांचे ड्रग्स-लोडेड फिलामेंट्स शोधण्यासाठी फ्यूजड डिपोझिशन मॉडेलिंग (एफडीएम) थ्रीडी- प्रिंटर्स विकसित करण्याचे काम करते. या मास्कमध्ये जीवाणू फिल्ट्रेशन कार्यक्षमता ९५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

रूळ इथल्या मर्क लाइफ सायन्सेसच्या सहकार्याने थिंकर टेक्नोलॉजीजद्वारे ते विकसित केले गेले. यात मर्क लाईफच्या संशोधन सुविधेचा वापर करण्यात आलाय. कोटिंग फॉर्म्युलेशनचा उपयोग फॅब्रिक थर कोटिंग करण्यासाठी केला आहे. कोटिंगसाठी वापरलेले साहित्य सोडियम ऑलेफिन सल्फोनेट आधारित मिश्रण आहे. साबण बनवण्यासाठी लागणारा हा घटक आहे ज्यात हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक गुणधर्म आहेत. विषाणूच्या संपर्कात आल्यावर तो विषाणूचा बाह्य पडदा विस्कळीत करतो. यात वापरलेली सामग्री साधारण तापमानात स्थिर आहे आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये ती मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या संभाव्य उपायांवर विचार करताना थ्री डी प्रिंटींग मास्क सर्वात महत्त्वाचे साधन म्हणून वापरला जाईल,असे लक्षात आले. त्याचप्रमाणे त्यावेळी सर्वसमान्यासाठी उपलब्ध असलेले मास्क हे कमी गुणवत्तेचे असल्याचे आम्हाला आढळले. त्यामुळे उच्च-दर्जाच्या मास्कच्या आवश्यकतेमुळे आम्ही संसर्ग रोखण्यासाठी किफायतशीर आणि अधिक प्रभावी व्हायरसीडल कोटेड मास्क विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला,असे संस्थापक संचालक डॉ. शितलकुमार झांबड यांनी सांगितले.


हेही वाचा – Coronasomnia: कोरोना महामारीने जगातील ६० टक्के लोकांची उडाली झोप!

 

First Published on: June 14, 2021 12:51 PM
Exit mobile version