‘अश्वगंधा’ आरोग्यासाठी लाभदायक

‘अश्वगंधा’ आरोग्यासाठी लाभदायक

अश्वगंधा ही एक गुणकारी औषधी वनस्पती आहे. अश्वगंधामुळे अनेक आजार ठीक करण्यासाठी मदत होते. अश्वगंधा एक बलवर्धक रसायन म्हणून देखील मानले जाते. त्याचबरोबर अश्वगंधाची पाने आणि त्याचे मूळ उकळून चहा बनवला जातो. जे आरोग्यासाठी लाभदायक असते. अजून ही अश्वगंधाचे काही फायदे आहेत.

पचन विकार

अपचन आणि मंदाग्नी यांवर अश्वगंधा गुणकारी आहे. पचनसंस्थेची विविध कामे सुरळीत होतात. पचन शक्ती वाढवायची असल्यास अश्वगंधाचा उपयोग करावा.

अशक्तपणा

सतत अशक्तपणा वाटत असल्यास आणि शक्ती वाढवण्यासाठी अश्वगंधा एक रामबाण उपाय आहे. अश्वगंधाच्या मुळ्याचे चूर्ण २ ग्रॅम रोज घ्यावे. याने अशक्तपणा कमी होऊन शरीराची ताकद वाढते.

संधिवात

संधिवातचा त्रास असल्यास रोज अश्वगंधा चूर्ण ३ ग्रॅम घ्यावे. संधिवातावर याचा उपयोग परिणामकारक औषधी आहे. याने नाक्की लाभ होतो.

क्षय रोग

क्षय रोग झाल्यास त्या व्यक्तीला अश्वगंधाच्या मुळ्यांचा काढा करुन त्यात मिरी आणि मध टाकून द्यावा. हा काढा गंडमाळांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. दररोज काढा घेतल्याने क्षय रोग समाप्त होतो.

निद्रानाश

निद्रानाश होत असल्यास अश्वगंधाच्या मुळा उपयुक्त ठरतात. मुळा शामक असल्याने निद्र नाश होत नाही.

त्वचा रोग

त्वचेच्या अनेक तक्रारींवर याची पाने गुणकारी आहे. गळवे आणि हात पायाची सूज यांवर पानांचा लेप लावावा. यांने उवा मारतात. त्याचप्रमाणे पुळ्या, व्रण वैगैरे त्वचा विकारांवर हा लेप गुणकारी आहे. अश्वगंधाची पाने तुपात टाकून त्याचे मलम करून जखमेवर लावल्यास जखम लवकर बरी होते.

नेत्रविकार

अश्वगंधाच्या पानांचा लेप डोळ्यांच्या विकारांवर गुणकारी आहे. मात्र, गरोदर स्त्रियांनी याचे औषध पोटात घेऊ नये. गर्भपात होण्याचा संभव असतो. यासाठी गरोदर स्त्रियांनी याचा वापर टाळावा.

अंगाला खाज येणे

अंगाला खाज येत असल्यास अश्वगंधाच्या पानांचा ३० मि.ली. रस काढून घेऊन त्यात जिरे टाकून घ्यावे. यामुळे अलर्जीमुळे होणारी खाज असते ती थांबते. आग सुद्धा शांत होते. त्यासाठी दिवसातून दोन वेळा हा रस घ्यावा.

आम्लपित्त

आम्लपित्त असणाऱ्यांनी अश्वगंधाच्या सालीचे चूर्ण किंवा काढा घेतल्यास आम्लपित्त कमी होते. पित्तामुळे अंगावर गांधी झाली असल्यास अश्वगंधाच्या पानांचा रस अंगाला लावावा यामुळे आराम मिळतो.

First Published on: November 19, 2019 7:00 AM
Exit mobile version