अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मुलीसाठी ‘या’ योजनांमध्ये करु शकता गुंतवणूक

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मुलीसाठी ‘या’ योजनांमध्ये करु शकता गुंतवणूक

अक्षय्य तृतीयेचा दिवस हा फार शुभ मानला जातो. यावेळी नव्या गोष्टी खरेदी करणे ते नव्या कामाची सुरुवात केली जाते. अशातच तुम्ही सुद्धा या शुभ मुहूर्तावर गुंतवणीकीचा विचार करत असाल तर तुमच्या मुलीसाठी विविध योजनांमध्ये गुंतवणूक करु शकता. अक्षय्य तृतीयानिमित्त गुंतवणूक करण्याचा हा उत्तम पर्याय ठरु शकतो. तर जाणून घेऊयात अशा कोणत्या योजना आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीसाठी गुंतवणूक करु शकता.

-सुकन्या समृद्धी योजना
व्याजाचे गणित पाहता तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करुन उत्तम रिटर्न्स मिळवू शकता. खास गोष्ट अशी की, ही योजना केवळ मुलींसाठीच आहे. या योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही वार्षिक ८ टक्क्यांपर्यंत व्याज मिळवू शकता. ही एक शासकीय योजना आहे. त्यामुळे तुमची मुलगी जेव्हा २१ वर्षाची होईल तेव्हा व्याजाच्या रक्कमेसह तुम्हाला संपूर्ण रक्कम मिळते.

-एफडी काढा
प्रत्येक बँक ही एफडीसाठी विविध व्याज देते. पंजाब नॅशनल बँक आणि एसबीआयसह काही बँका ६ किंवा त्यापेक्षा अधिक टक्के व्याज देता. एका मर्यादित कालावधीसाठी तुम्ही तुमच्या मुलीसाठी एफडी काढू शकता. यामध्ये सु्द्धा उत्तम व्याज मिळू शकते.

-पिगी बँक खरेदी करा
काळानुसार लोकांनी आपल्या घरात पिगी बँक आणणे बंद केले आहे. मात्र बचत करण्याचा हा एक सोप्पा मार्ग आहे. त्यामुळे मुलीला एक पिगी बँक खरेदी करुन देऊ शकता. त्यामध्ये तिला शक्य होईल तेवढी रक्कम जमा करण्यास सांगत जा.

-म्युचअल फंड अथवा एसआयपी
तुम्ही म्युचअल फंडच्या योजनेत किंवा एसआयपी मध्ये गुंतवणूक करु शकता. यामध्ये कमीत कमी ५०० रुपयांपासून तुम्ही गुंतवणूक करु शकता.

 


हेही वाचा: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरातून फेकून द्या गोष्टी, अन्यथा दारिद्र लागेल मागे

First Published on: April 11, 2023 5:50 PM
Exit mobile version