खोकल्यासाठी घरगुती ‘आलेपाक’

खोकल्यासाठी घरगुती ‘आलेपाक’

घरच्या घरी 'आलेपाक'

खोकल्यामुळे घशातील खवखव अधिक वाढते. यावर बाजारात अनेक गोळ्या देखील उपलब्ध आहेत. मात्र अनेकांना या गोळ्यांचे सेवन करणे आवडत नाही. अशा व्यक्तीने जर घरच्या घरी तयार केलेल्या आलेपाकाचे सेवन केल्याने घशाची खवखव देखील दूर होण्यास मदत होते. त्यामुळे घरच्या घरी हा ‘आलेपाक’ नक्कीच ट्राय करुन पहा आणि खोकला दूर करा.

साहित्य :

आलं – १२५ ग्रॅम
साखर – दिड वाटी
तुप – १ चमचा

कृत्ती :

सर्व प्रथम आले किसून घ्यावे. त्यानंतर १ चमचा तुपामध्ये किसून घेतलेले आले परतून घ्यावे. त्यानंतर मंद आचेवर परताना त्यामध्ये दिड वाटी साखर घालून सर्व सारण एकजीव करुन घेणे. साखर घातल्यानंतर त्या आलेपाकला पाणी सुटते. जोपर्यंत तो आलेपाक घट होत नाही तोपर्यंत ते सारण मंद आचेवर एकजीव करुन घेणे. मिश्रण घट झाल्यानंतर पोळपाटावर थोडेसे तूप लावून ते सारण पसरवून घेणे. थोडेसे थंड झाल्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुकडे कापून घेणे. अशाप्रकारे तुमचा घरच्या घरी खोकळ्यावर रामबाण असा आलेपाक तुमचा खोकला आणि सर्दी दूर करण्यास नक्की फायदेशीर ठरेल.

First Published on: May 21, 2019 7:00 AM
Exit mobile version