कोरफडचा रस ओल्या केसांवर लावावा की कोरड्या?

कोरफडचा रस ओल्या केसांवर लावावा की कोरड्या?

तुमच्या घरात कोरफडीचा झाडं असेल तर त्याचा विविध प्रकारे वापर केला जातो. स्किन संबंधित समस्या असो किंवा केस गळतीची समस्या यासाठी कोरफडचा वापर केला जातो. केसांची उत्तम काळजी घेण्यासाठी तुम्ही कोरफीडीचे जेल केसांना कंडीशनर म्हणून वापरु शकता.

पण काहीजणांना समजत नाही की, कोरफडचा रस ओल्या केसांवर लावावा की कोरड्या. अशातच आम्ही तुम्हाला सुद्धा कोरफडचा रस नक्की कसा लावावा हे कळत नसेल तर याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

केसांना कोरफडचा रस लावण्याची योग्य पद्धत
-कोरडफचा रस नेहमीच कोरड्या केसांवर लावला पाहिजे. जर तुम्ही ओल्या केसांवर तो लावत असाल तर केसांमधील पाण्यासोबत तो सुकतो. यामुळे जेव्हा कधी कोरफडचा रस कोरड्या केसांना लावाल तेव्हाच त्याचे परिणाम दिसून येतील.
-कोरफडचा रस एका वाटीत घेऊन आपल्या बोटांनी तो केसांच्या मुळांना लावा. तसेच संपूर्ण केसांना लागला आहे की नाही हे सुद्धा पहा. अर्धा तास तसेच केसांना रस लावून ठेवल्यानंतर शॅम्पूने केस धुवा.
-कोरफडचा रस तुम्ही आठवड्यातून दोनदा केसांना लावू शकता. हे तुमच्या केसांसाठी उत्तम कंडीशनरचे काम करतो.
-तु्म्ही कोरफडचा रस अन्य एखाद्या गोष्टीत मिक्स करुन लावून शकता. तुम्ही यासाठी नारळाचे तेल किंवा बदामाचे तेल ही वापरु शकता.
-तुम्ही कोरफडीच्या रसात ग्रीन टी सुद्धा मिक्स करुन केसांना लावू शकता. यामुळे तुमचे केस चमकदार आणि दाट होतील.


हेही वाचा- उन्हाळ्यात नितळ त्वचेसाठी टॉमॅटोचे ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा

First Published on: May 27, 2023 1:50 PM
Exit mobile version