Sunday, May 12, 2024
घरमानिनीRecipeमूलं जेवायला कंटाळतात? मग फॉलो करा 'या' गोष्टी

मूलं जेवायला कंटाळतात? मग फॉलो करा ‘या’ गोष्टी

Subscribe

जंक फूडच्या नावाखाली मुलं लगेच जेवायला बसतात, पण जर तुम्ही त्यांना घरी बनवलेले पदार्थ खायला दिलेत तर मुलं त्याचा कंटाळा करतात किंवा काहीतरी बहाणा करून खाणे टाळतात. टाळणं अशक्य झालं तर मग अनिच्छेने खातात.कारण पालक त्यांना जबरदस्तीने खायला देतात.अशावेळी मुले रडू लागतात आणि चिडचिड देखील करतात. पण मुलांनी घरचा पोषक आहार खायलाच हवा म्हणून पालक त्यांना खाण्याची सक्ती करतात. पण बऱ्याचवेळा सगळे प्रयत्न करूनही काही हट्टी मूलं खात नाहीत. अशावेळी मुलं उपाशी राहील्याची चुटपुट आईला लागून राहते. पण अशावेळी त्या मुलांना कसं हँडल करायचं असा प्रश्न आयांना पडतो.पण काही गोष्टींच काटेकोरपणे पालन केल्यास मुलं त्यांच्या पुढ्यात जे द्याल ते आनंदाने खातील.

10 Tips to Get a Child to Eat When They Refuse

- Advertisement -

जेवण चांगले सर्व्ह करा

मुलांना ताटात पोळी, भाजी,वरण किंवा आमटी, भात,कोशिंबीर दिली तर त्यांना ते आवडणार नाही. त्याऐवजी मुलांचे जेवण रंगीबेरंगी बनवा, त्यासाठी त्यांच्या ताटात इतर पदार्थांबरोबरच सॅलडही ठेवा. सॅलडमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. सॅलडसाठी काकडी आणि टोमॅटो चांगल्या आकारात कापून घ्या. मुलांना असं कलरफुल ताट फार आवडतं आपण काहीतरी वेगळं खातोय असा त्यांना फील येतो.

- Advertisement -

जेवण वाढताना मुलांना सहभागी करून घ्या

सॅलड्सची व्यवस्था करणे, फळे तोडणे आणि सोलणे यासारख्या सर्व्हिंगसाठी अन्न तयार करण्यात मुलांना सामील करा. सॅलड कापल्यानंतर मुलांना सॅलड सजवायला लावावा. मूल मोठ असेल तर थालीपीठ कसं तयार करतात हे त्याला दाखवा. जेव्हा मूल स्वत:च्या हाताने तो पदार्थ बनवण्याच्या कामात गुंतेल तेव्हा त्याचे अन्नावरील प्रेम वाढेल. अशा परिस्थितीत तो मनापासून अन्न खाईल.

जेवणात व्हरायटी हवी

तेच तेच पदार्थ खाऊन मुलं कंटाळतात. यातूनच मग मुलं पदार्थ कोणता बनवला आहे हे पाहूनच जेवायचं की नाही ते ठरवतात.यामुळे जेवणात व्हरायटी हवी.

 


हेही वाचा :

मुलांसाठी हेल्दी ब्रेकफास्ट

- Advertisment -

Manini