प्लास्टिकचे टिफीन, बाटल्या, प्लेट्स वापरणे टाळा

प्लास्टिकचे टिफीन, बाटल्या, प्लेट्स वापरणे टाळा

प्लास्टीक हे टिकाऊ असल्याबरोबरच तांबे ,पितळ,स्टील, अल्युनिमियम या धातूंच्या तुलनेत स्वस्त आणि परवडणारे आहे. शिवाय दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या इतर धातुंच्या वस्तूंच्या तुलनेत प्लास्टीकच्या वस्तू सहज कुठेही आणि कधीही उपलब्ध आहेत. तसेच धुवायला सोप्या आणि दिसायला आकर्षक असल्यामुळे आपल्याकडे प्रत्येक किचनमध्ये प्लास्टिकच्या वस्तू दिसतात. यात प्रामुख्याने डाळी, कडधान्य, सुका खाऊ यासारखे खाण्याचे पदार्थ ठेवण्यासाठी प्लास्टीकच्या डब्याचा उपयोग आपण करतो. एवढंच नाही तर सहज धुता येत असल्याने प्लास्टीकच्या बाटल्या, प्लेट, ग्लास, चमचे, काटे, चाकू, कटर, सुऱ्या, टिफीन, पिशव्या, ही प्लास्टीकचेच वापरतो.

वापरायला सोयीस्कर असल्याने आपल्या जीवनात प्लास्टिकचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. खाण्यापासून ते पेयापर्यंतच्या बहुतांश गोष्टींसाठी आपण प्लास्टिकच्या वस्तू वापरतोय. मुलांना दुपारचे जेवण प्लास्टिकच्या बॉक्समध्ये दिले जाते आणि फ्रीजमधील प्लास्टिकच्या बॉक्समध्ये अन्न साठवले जाते.

 

पण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार प्लास्टीक स्लो पॉयझन असून प्लास्टिक अन्नाच्या संपर्कात आल्यावर त्याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होतात. कारण जेव्हा गरम किंवा चरबीयुक्त ,पदार्थ प्लास्टीकच्या संपकार्त येतो त्यावेळी त्यातील घातक रसायनही पदार्थात मिसळतात. प्लास्टिकच्या वस्तूमध्ये पीईटीई, ज्याला पॉलिथिलीन टेरेफ्थालेट असे म्हणतात वापरले जाते. जे प्रामुख्याने एकदाच वापरण्यासाठी सुरक्षित मानले जाते. पण हे प्लास्टिक आपण वारंवार वापरतो. त्यात जेवण गरमही करतो. जे आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे प्लास्टीकच्या डब्याचा वापर जेवणासाठी करणे टाळावे. त्याऐवजी वेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळी देत आहेत.

प्लास्टिकच्या डब्यांमध्ये अन्न साठवणे ही सामान्य बाब आहे मात्र त्यात अन्न गरम करून खाणे किंवा गरम पदार्थ टाकून खाणे अयोग्य आहे. त्यामुळे प्लास्टीक बनवण्यासाठी वापरण्यात आलेले पदार्थ अन्नामध्ये जाऊ शकतात. त्यामुळे गरम, तेलकट आणि आम्लयुक्त पदार्थ प्लास्टिकच्या डब्यात कधीही साठवू नये.

प्लास्टिकला पर्याय

 

तज्ञांच्या मते, प्लॅस्टिक व्यतिरिक्त, आपण अन्न साठवण्यासाठी वापरू शकता ते कंटेनर काच, स्टेनलेस स्टील, सिलिकॉन, मेण आणि बांबूपासून बनलेले कंटेनर आहेत. या सर्व कंटेनरमध्ये विषारी पदार्थ नसतात. या डब्यांमध्ये तुम्ही तुमचे अन्न सहज सुरक्षित ठेवू शकता.

प्लास्टिक डबे खरेदी करताना त्याच्या जाडीकडे लक्ष द्या. फक्त फूड ग्रेड किंवा बीपीए फ्री कंटेनर खरेदी करा. बीपीए हे एक रसायन आहे जे आरोग्याला धोकादायक आहे. तसेच मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिकचे कंटेनर ठेवणे टाळा कारण उष्णतेमुळे प्लास्टिकमधून रसायनं बाहेर पडते आणि पदार्थात मिसळते.


हेही वाचा : Diet Side Effect -झिरो फिगरच्या नादाचे असेही साईड इफेक्टस्

First Published on: April 11, 2024 2:56 PM
Exit mobile version