Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthDiet Side Effect -झिरो फिगरच्या नादाचे असेही साईड इफेक्टस्

Diet Side Effect -झिरो फिगरच्या नादाचे असेही साईड इफेक्टस्

Subscribe

आपण चिरतरुण, सुंदर,आकर्षक दिसावे असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी परफेक्ट झिरो फिगर आणि फिचरही हवेच. यामुळे हल्ली सर्वच वयोगटातील व्यक्ती वजन कमी करण्यासाठी डाएटींग करू लागल्या आहेत. पण डाएटींग करणं आणि ती कायम ठेवणं हे तसं आव्हानात्नक काम आहे. त्यासाठी फक्त कमी खाणं हेच उपयोगाचं नसून योग्य प्रमाणात योग्य आहार घेणं, व्यायाम हे महत्वाच आहे. मात्र बरेचवेळा हेच लक्षात घेतलं जात नाही. शरीराची उपासमार करून डाएट केलं जातं. त्यासाठी मग बाजारात उपलब्ध असलेले पाकिट पॅक फूडस खाल्ले जातात. योग्य वैद्यकिय सल्ल्याशिवाय प्रोटीन पावडर खाल्ल्या जातात. परिणामी सुरुवातीला कमी जेवणामुळे वजन कमी होत असले, इंचे्स कमी होतात. यादरम्यान, फिगर जरी झिरो होत असली तरी ठराविक कालावधीनंतर शरीर तक्रार करू लागते. योग्य घटक शरीराला मिळत नसल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. विविध आजारांना आयतचं आमंत्रण मिळते. यामुळे वजन कमी करण्यासाठी डाएटींग करताना ती तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानुसारच करावी.

- Advertisement -

चयापचय मंद होते

अचानक जेवण कमी केल्याने ृशरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होऊ लागते, त्यामुळे शरीर ऊर्जा म्हणून चरबी वापरण्यास सुरवात करते. त्यामुळे चयापचय मंदावते. यामुळे वजन तर कमी होतच नाही शिवाय थकवा जाणवायला लागतो.

- Advertisement -

मानसिक आरोग्य

तसेच खाण्याशी संबंधित विकार जडू लागतात. अचानक जास्त भूक लागते. , तर काहींची भूक मंदावते. दीर्घकाळ डाएटिंग केल्याने एनोरेक्सिया नर्वोसा, बुलिमिया नर्वोसा किंवा बिंज इटिंग डिसऑर्डरची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे मूड चिडचिड होतो, राग वाढतो आणि तणावाची पातळी देखील वाढते.

घटकांची कमतरता

योग्य आहार न मिळाल्याने शरीरात जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम आणि प्रथिने यांची कमतरता निर्माण होते. ज्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो.

हे सर्व टाळण्यासाठी काय कराल?

व्यायामासाठी दररोज 15-20 मिनिटे काढा.

आहारातून चरबीयुक्त अतिपदार्थ वगळावीत.

त्याऐवजी प्रोटीनयुक्त पदार्थ, हिरव्या भाज्या आणि कडधान्य खावीत.

पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे

पुरेशी झोप घ्यावी.

 

- Advertisment -

Manini