बेसन पीठाचे सौंदर्यवर्धक फायदे

बेसन पीठाचे सौंदर्यवर्धक फायदे

Gram flour

बेसन तर सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असते. बेसन आरोग्य आणि सुंदरता उजळवण्याचे काम करते. ज्या मुलींना आपल्या त्वचा आणि चेहर्‍याविषयी प्रेम आहे. त्या मुली आपला चेहरा साबणाने नाही तर बेसनने धुणे पसंत करतात. बेसनाचा वापर तुम्ही रोज दही, गुलाबपाणी किंवा हळद टाकून करु शकता. साबणात जसे अनेक केमिकल्स असतात तर बेसन हे नैसर्गिक असते. बेसन चेहर्‍यावर लावल्याने चेहर्‍याला अनेक फायदे मिळतात. चला तर मग जाणून घेऊया बेसन पीठाच्या फायद्यांविषयी…

टॅनिंग दूर करतं

चेहर्‍याला साबणाऐवजी बेसनने धुतल्याने चेहर्‍याचा रंग उजळतो. टॅनिंग दूर होते आणि चेहर्‍याला एक वेगळीच चमक येते.

डेड स्किन नष्ट करते

तुम्ही बेसनची पेस्ट चेहर्‍यावर लावून थोडावेळा स्क्रब करु शकता. असे केल्याने डेड स्किन निघून जाईल आणि चेहर्‍याची त्वचा स्वच्छ होईल.

चेहर्‍याचा रंग उजळतो

बेसनमध्ये ब्लीचिंग गुण असतात जे त्वचेला नैसर्गिक पध्दतीने ब्लीच करते.

पिंपल्स दूर करतात 

जर तुम्ही चेहर्‍याला नियमित बेसनाने धुतले तर पिंपल्स हळूहळू कमी होतील आणि चेहरा स्वच्छ होईल.

डाग मिटवते

यामधील ब्लीचिंग तत्त्व चेहर्‍यावरुन डाग हलके करतात. यामुळे साबणाने नाही तर बेसनने चेहरा धुवा.

ब्लॅकहेड्स नष्ट 

तुमच्या नाकावर जर ब्लॅकहेड्स असतील तर बेसनपेक्षा चांगला उपाय कोणताच नाही.

पोर्स टाइट होतात

चेहर्‍याचे मोठे पोर्स पाहण्यास खराब दिसतात. यामुळे हे कमी करण्यासाठी नेहमी बेसन पावडर लावा. काही दिवसातच तुम्हाला फायदा दिसून येईल.

तेलकटपणा कमी करतं

चेहर्‍यावर साबण लावल्याने चेहर्‍यावरुन तेल तर गायब होतेच, परंतु चेहर्‍याचा ओलावा गायब होतो. बेसन पावडर लावल्याने असे होत नाही. तुम्ही हे लावले तर तुम्हाला फायदा होईल.

त्वचा मऊ होते

बेसन पावडर लावल्याने त्वचा मुलायम बनते. जर तुम्ही प्रत्येक वेळी चेहर्र्‍यावर साबण लावला तर चेहरा कोरडा पडेल.

First Published on: December 3, 2018 5:10 AM
Exit mobile version