आईस्क्रीम खा तंदरुस्त रहा!

आईस्क्रीम खा तंदरुस्त रहा!

आईस्क्रीम

आईस्क्रीम खाणे कोणाला आवडत नाही. अनेकांच्या आईस्क्रीम म्हटलं का तोंडाला पाणी सुटत. मात्र, बऱ्याचदा घरातील मोठी मंडळी आईस्क्रीम खाणे आरोग्यासाठी योग्य नाही, असे सांगत आईस्क्रीम खाण्यास नकार देतात. पण काही बाबतीत हे आईस्क्रीम आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. आईस्क्रीममध्ये बरेच पोषक तत्त्व असतात. याच्या सेवनामुळे तुमचे शरीर निरोगी राहत. चला तर जाणून घेऊया आईस्क्रीम खाण्याचे खास फायदे

हाडांची मजबुती वाढते

आईस्क्रीम हे दुधापासून बनवले जाते. तसेच दुधामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे कॅल्शियमच्या सेवनामुळे हाड मजबूत होतात. शरीरात उपस्थित ९९ टक्के कॅल्शियम हे हाडांमध्येच असते. त्यामुळे दररोज दुधाचे आईस्क्रीम खाल्ल्यास हाडांचे आजार दूर होण्यास मदत होते.

स्किनसाठी फायदेशीर

दुधापासून तयार करण्यात आलेल्या आईस्क्रीममध्ये प्रोटीनचा समावेश असतो. प्रोटीन हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. प्रोटीनचे सेवन केल्याने ऊतक आणि स्नायू मजबूत होतात. शरीराला प्रोटीनची अत्यंत गरज असते. प्रोटीनमुळे हाड, स्नायू, रक्त आणि त्वचेसाठी फायदेशीर असते.

रोग – प्रतिरोधक क्षमता वाढते

आईस्क्रीममध्ये व्हिटॅमिन ए, बी २ आणि बी १२ असते.  व्हिटॅमिन ए मुळे तुमची स्किन, हाड आणि इम्यूनिटी सिस्टमच्या क्षमतेला वाढवत.

वजन कमी होते

आईस्क्रीम खाल्ल्यामुळे वजन घटण्यास मदत होते. व्हिटॅमिन बी- आणि बी-१२ मेटाबॉलिझमला संतुलित ठेवतो आणि बी-१२ वजन कमी करण्यास सहायक असतो.

शरिरातील थकवा दूर होतो

शरीरातील थकवा दूर होण्यासाठी दररोज एक कप आईस्क्रीमचे सेवन करावे. यामुळे थकवा दूर होण्यास मदत होते. दुधामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचे घटक असल्यामुळे थकवा येत नाही.

First Published on: June 9, 2019 6:00 AM
Exit mobile version