मिठाच्या पाण्याने आंघोळ करा आणि कमाल बघा

मिठाच्या पाण्याने आंघोळ करा आणि कमाल बघा

मिठाच्या पाण्याने आंघोळ करा आणि कमाल बघा

जेवणातील चव वाढवणारा पदार्थ म्हणजे मीठ. मीठा शिवाय जेवणाला चवच येत नाही. मात्र, याच मीठाचा वापर जर आंघोळीसाठी केला तर शरीराच्या अनेक समस्या दूर होतील. मिठातील मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सोडियम आपल्याला त्वचेच्या इंफेक्शन पासून दूर ठेवतात. रोज आंघोळ करताना थोडंस मीठ पाण्यात टाकून, त्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर ठरते.

थकवा होतो दूर

थकवा वाटत असल्यास मिठाच्या पाण्याने आंघोळ करावी. यामुळे थकवा दूर होतो.

त्वचा उजळते

मिळाच्या पाण्याने आंघोळ केल्याने डेड स्किन निघून जाते आणि रंग उजळण्यास मदत होते. तसेच त्वचा सॉफ्ट आणि चमकदार बनते. त्याचप्रमाणे त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत.

कोंडा कमी होतो

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने केसांमधील दुर्गंधी आणि केसांमधील कोंडा कमी होतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

हाडांना मजबूती मिळते

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने हाडांना मजबूती मिळते. त्याचप्रमाणे खांदे दुखी होत असल्यास ती कमी होते.

इन्फेकशनवर रामबाण उपाय

शरीरावर कोणत्याही प्रकारचे इन्फेकशन झाले असेल तर मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने फायदा होतो.

वजन कमी होण्यासाठी मदत

मीठ आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते. त्यासाठी आल्याचा तुकडा घ्या, त्याचे तुकडे एक चमचा ईप्सम सॉल्टमध्ये टाका. हे मिश्रण आंघोळीच्या पाण्यात टाका आणि या पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता.


हेही वाचा – असे दूर करा लॉकडाऊनमधील नैराश्य


 

First Published on: May 22, 2020 6:10 AM
Exit mobile version